मलायका अरोराच्या चालण्याची आता गीता कपूरने ही उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ

गीता कपूर आणि टेरेन्स लुईस मलायका अरोराच्या स्टाईलची कॉपी करताना दिसत आहेत.

Updated: Oct 1, 2021, 03:47 PM IST
मलायका अरोराच्या चालण्याची आता गीता कपूरने ही उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : कपिल शर्माचा प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये दर आठवड्याला नवीन पाहुण्यांची एंट्री होत असते ज्यामुळे चित्रपटांपासून ते पाहूण्यांच्या संदर्भातील अनेक गोष्टीवरुन पडदा उघजतो आणि आपल्याला जे माहिती नसतं अशा गोष्टींची आपल्यालाला माहिती मिळते.यावेळी 'द कपिल शर्मा शो'मध्ये अभिनेत्री मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस पोहोचले. शोचे अनेक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले आहेत.

आता पुन्हा सोनीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शोच्या या भागातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

व्हिडीओमध्ये गीता कपूर आणि टेरेन्स लुईस मलायका अरोराच्या स्टाईलची कॉपी करताना दिसत आहेत. मलायका देखील त्यांच्या या ऍक्टिंगचा पुरेपूर आनंद घेत आहे.

कपिल शर्माने शोमध्ये मलायका अरोराला एक प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नावर गीता कपूरने चाहत्यांना सांगायला सुरुवात केली की मलायका अरोरा सकाळी कशी फिरायला जाते. गीता कपूरने मलायकाच्या चालण्याच्या शैलीची नक्कल केल्याचे पाहून सगळे हसत आहे. हे पाहून खुद्द मलायका अरोरालाही हसू आवरता आले नाही.

पुढे शो मध्ये, टेरेन्स लुईस देखील मलायकाची कॉपी करतानाही दिसला. 'द कपिल शर्मा शो' ची ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर मलाईकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या चालण्य़ावरुन लोकं तिच्ची खिल्ली उडवत आहेत. खरेतर मलाईका जिममधून आली होती, परंतु त्यावेळेस ती विचित्र प्रकारे चालत असल्याचे लोकांनी तिला पाहिले, ज्यामुळे ती खूप वाईट प्रकारे ट्रोल झाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंडियाज बेस्ट डांसरचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भात मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस कपिलच्या शोमध्ये त्यांच्या प्रमोशनसाठी आले होते. मलायका अरोराबद्दल बोलायचं तर तिची स्टायलिश चित्रे सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट होत राहतात.

मलायका अरोराने तिच्या खास गाण्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. त्यांनी 'छैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत.