Ganesh Charthi 2023 : अनुष्काही लागली गणपतीच्या तयारीला; घरातील अडचण पाहून म्हणाल 'तुमचं आमचं सेम असतं'

Ganesh Charthi 2023 : सध्या सर्वत्र एकच माहोल आहे आणि तो म्हणजे बाप्पाच्या आगमनाचा. तुमच्या घरची गणपतीची तयारी कुठवर आली? पाहा विराट- अनुष्काच्या घरात कशी सुरुये तयारी...   

सायली पाटील | Updated: Sep 18, 2023, 02:23 PM IST
Ganesh Charthi 2023 : अनुष्काही लागली गणपतीच्या तयारीला; घरातील अडचण पाहून म्हणाल 'तुमचं आमचं सेम असतं' title=
ganesh chaturthi 2023 Bollywood Actress Anushka sharma preparing for ganeshotsav

Ganesh Charthi 2023 : भारतीय क्रिकेट संघातील धडाडीचा खेळाडू आणि कधी एकेकाळी संघाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या (Virat Kohli) विराट कोहलीनं आशिया चषकामध्येही दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. तिथं विराट त्याच्या कारकिर्दीत धावांची भर टाकत असताना आणि क्रिकेटप्रेमींच्या मनाचा ठाव घेत असतानाच इथं अनुष्का मात्र वेगळ्याच तयारीत रमल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर फोटो शेअर करत खुद्द अनुष्कानंच आपण नेमरं काय करत आहोत आणि घरात नेमकं काय चित्र आहे हेच सर्वांसमोर आणलं. तुम्हीही तिनं शेअर केलेला फोटो पाहून घ्या. आता तुम्ही म्हणाल ही अनुष्का नेमकं करतेय तरी काय? तर तीसुद्धा गणेशोत्सवाच्या तयारीला लागली आहे. 

सध्या सर्वत्र घरोघरी आणि गल्लीबोळात असणाऱ्या मंडळांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाचीच तयारी सुरु आहे. अनुष्काच्या घरातही हीच परिस्थिती. कारण, तिच्या घरातही सामानाची जागा बदली आहे. त्यामुळं अनुष्काला थेट घराच्या जीममध्येच बसून एक फोटो काढण्याची सवड मिळाली आहे. फोटो इन्स्टा स्टोरीतून शेअर करताना अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ज्यावेळी तुम्हाला घरातील फर्निचर गणपतीसाठी हलवावं लागतं आणि जीम ही एकमेव जागात उरते'. 

ganesh chaturthi 2023 Bollywood Actress Anushka sharma preparing for ganeshotsav

तुमचं आमचं सेम असतं... 

अनुष्कानं ज्या क्षणी तिच्या घरातील गणपतीच्या तयारीचा फोटो शेअर केला त्या क्षणापासून अनेकांनीच तिच्या या फोटोशी सहमत होत अरेच्छा! आमच्या घरातही काहीशी अशीच परिस्थिती असल्याचं म्हटलं. तिच्या अवतीभोवती दिसणारा पसारा पाहून आपल्या घरातही काहीसं असंच चित्रं होतं अशा कमेंट्स फॉलोअर्सनी केल्या. थोडक्यात काय, तर इथं सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य अशी दरी राहिली नाही. कारण गणपतीच्या बाबतीत तुमचं आमचं सेम असतं... नाही का?

Jawan Collection Day 11: जगात 800 तर, भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये जवान, 'गदर 2'ला धुतलं, आता ‘पठाण’शी स्पर्धा

 

अनुष्का आणि विराटच्या अध्यात्मिक धारणेविषयी सांगावं तर ही जोडी कायमच त्यांच्या जीवनात या साऱ्याला प्राधान्य देताना दिसले आहेत. आपल्या गुरुंची वचनं स्मरत त्यांच्या उपदेशांचं पालन करणं असो किंवा मग सणवार, पूजाअर्चा यथासांग पूर्ण करणं असो. अनुष्का - विराट कायमच त्यांना व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढताना दिसले आहेत. त्यामुळं इथं आश्चर्य वाटण्याचं कारणच नाही.