प्रसिद्ध मॉडेलकडून जग सोडण्याआधी स्वत:च्याच मृत्यूची भविष्यवाणी

24 वर्षीय सेलिब्रिटीच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Updated: Nov 1, 2021, 08:34 PM IST
 प्रसिद्ध मॉडेलकडून जग सोडण्याआधी स्वत:च्याच मृत्यूची भविष्यवाणी title=

मुंबई : मिस केरळ 2019 आणि दक्षिण भारत 2021 ची विजेती अन्सी कबीरच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. 24 वर्षीय सेलिब्रिटीच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.  या रोड एक्सिडंटमध्ये अंसी कबीरसोबत मिस केरळ 2019 ची उपविजेती अंजना शाजन हिचाही मृत्यू झाला आहे. अंजना देखील अंसीसोबत त्याच कारमध्ये होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली. 

अन्सी कबीर यांनी घटनेच्या काही काळापूर्वी हे सांगितलं होतं
रोड एक्सिडंच्या काही वेळापूर्वी अन्सीं कबीरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं होतं, 'जाण्याची वेळ आली आहे'. या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सोमवारी सांगितलं की, मिस केरळ आणि धावपटूचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या बातमी नंतर तिचे चाहते आणि मित्र परिवार तिला श्रद्धांजली वाहत आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली
दुचाकीला टाळण्याच्या प्रयत्नात कारचा ताबा सुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मिस केरळ 2019 ची विजेती अन्सी कबीर सोबत प्रवास करणारी 26 वर्षीय अंजना शाजन आणि इतर दोघांसोबत कारमधून प्रवास करत होत्या. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर या घटनेतील अन्य दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात कारचं पूर्णपणे नुकसान झालं असून ब्यूटी काँन्टेस्टमधील दोन विजेत्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.