फोर्ब्स मॅग्झीन यादीत जगातील या शक्तिशाली महिला

फोर्ब्स मॅग्झीनने जगातील सर्वात लोकप्रिय महिलांची यादी प्रसिद्ध केलेय. या यादीत पेप्सीकोच्या मुख्यकार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या अध्यक्ष चंदा कोचर यांच्यासोबत अनेक भारतीय महिलांचा समावेश आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 2, 2017, 07:35 PM IST
फोर्ब्स मॅग्झीन यादीत जगातील या शक्तिशाली महिला title=

मुंबई : फोर्ब्स मॅग्झीनने जगातील सर्वात लोकप्रिय महिलांची यादी प्रसिद्ध केलेय. या यादीत पेप्सीकोच्या मुख्यकार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या अध्यक्ष चंदा कोचर यांच्यासोबत अनेक भारतीय महिलांचा समावेश आहे. जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावाचा समावेश झाला आहे. प्रियंका चोप्रा हिला ९७ वी रँक मिळाली आहे.

११ व्या स्थानावर इंदिरा नूयी तर ३२ व्या स्थानावर चंदा कोचर आहेत.  चंदा कोचर यांचे दुसऱ्यांदा या यादीत नाव आले आहे. चंदा कोचर यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीआयसीआयने डिजिटल व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत, १७ राज्यांतील ११००० गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि संभाव्य उद्योजकांना वित्तीय साधने उपलब्ध करुन दिली आहेत. या कार्यक्रमाद्वारे आयसीआयसीआयला वर्षाच्या अखेरीस ५०० गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. चंदा कोचर भारतातील खासगी बँकांचे सीईओ आहेत.

तर फोर्ब्सने मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत प्रियंकाला स्थान दिले आहे. फोर्ब्सने प्रियंकाच्या अमेरिकेतील टीव्ही शो 'क्वाँटिको'ची विशेष प्रशंसा केली आहे.

प्रियंका चोप्रा बॉलिवूड ते हॉलीवूड असा प्रवास केलाय. ती एक यशस्वी अभिनेत्री आहे असे फोर्ब्स मॅग्झीनने म्हटलेय. अमेरिकेतील एका टीव्ही शोमध्ये काम करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री असल्याचेही फोर्ब्सने उल्लेख केलाय. जास्त कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोप्रा फोर्ब्सच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी ती या यादीत १०व्या स्थानी होती.

फोर्ब्सच्या या यादीत पॉप क्वीन बियॉन्स चौथ्या, गायक टेलर स्विफ्ट १२ आणि हॅरी पॉटरची लेखिका जेके रोलिंग १३व्या स्थानावर आहे.