मुंबई : नदीम श्रवण या प्रसिद्ध संगीतकार जोडीमधील श्रवण राठौर यांचं मुंबईत कोरोनाने निधन झालं. त्याचे जोडादार नदीम सैफ त्याच्या मृत्यूची बातमी पोहोचताच नदीम सैफ आतल्या आत तुटून गेले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाशी फोनवर बोलताना नदीम सैफी ढसाढसा रडू लागले. श्रवणच्या आठवणीत ते म्हणाले की, माझा शानू गेला.... श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईच्या ब्रांद्रा येथील एसएल रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
नदीम यांचं विधान
नदीम यांनी सांगितलं, ''आम्ही आमच्या आयुष्यातील चढ-उतार एकत्र पाहिले. आम्ही एकमेकांना पुढे जाताना पाहिलं. आमच्यात कधीच अंतर नव्हतं''. 1997 मध्ये प्रसिद्ध उद्योजक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी नदीमचं नाव या प्रकरणात पुढे आलं होतं आणि यामुळे नदीम लंडनमध्ये पळून गेले होते. यानंतर ते पुन्हा कधीच भारतात परतले नाही. नदीम पळून गेल्यानंतर ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही
नदीम यांनी सांगितलं की, श्रावण यांच्याबद्दल समजलं ते त्यांच्या मुलाकडून मी त्याचा मुलाशी सतत संपर्क होतो आणि त्यांच्या तब्येतची चौकशी करत असल्याचं नदीम म्हणाले. पण श्रवण अचानक सोडून कायमचा निरोप घेतील याची मला कल्पना देखील नव्हती. त्यांनी सांगितलं की, श्रावण यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी देखील आजारी आहेत आणि त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हृदयरोगाने ग्रस्त
श्रवण हे वयाच्या 66व्या वर्षी ह्दयाच्या आजाराने त्रस्त होते. कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं पण जेव्हा त्यांची प्रकृती नाजूक होती तेव्हा त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं. मात्र कोरोनाला लढा देणाऱ्या श्रावण यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी गद्दार या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितली.
'90'दशकातील सुपरहिट जोडी
नदीम- श्रवण हे 90च्या दशकात सर्वाधिक हिट जोडी होती. परदेश, आशिकी, राजा हिंदुस्थानी, साजन आणि सडक या सगळ्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिले आणि या चित्रपटांच्या हिट होण्याचं कारण म्हणजे त्यांचं संगीत. श्रवणला सुरुवातीपासूनच मधुमेह होता, त्यामुळे त्यांचा हृदयरोग अधिक गंभीर झाला, असं लेखक समीर यांनी सांगितलं. रूपकुमार राठोड आणि विनोद राठोड हे श्रावणचे दोन भाऊ प्रसिद्ध गायक आहेत.