Nayanthara आणि Vignesh Shivan यांच्या जुळ्या मुलांची पहिली झलक

Nayanthara आणि Vignesh Shivan यांच्या जुळ्या मुलांचा खास व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल   

Updated: Oct 25, 2022, 11:10 AM IST
Nayanthara आणि Vignesh Shivan यांच्या जुळ्या मुलांची पहिली झलक  title=

Nayanthara and Vignesh Shivan kids :   दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा (Nayanthara)आणि तिचा पती विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) हे आई-वडील झाले आहेत. या जोडप्याने जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. विघ्नेश आणि नयनतारानं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या जोडप्यानं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्यात नव्या पाहुण्यांची एन्ट्री झाल्यानंतर विघ्नेशने एक पोस्ट शेअर केली आहे. (nayanthara vignesh shivan)

आता देखील नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या जुळ्या मुलांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हारयल होत आहे. विघ्नेशने नयनतारा आणि जुळ्या मुलांसोबत दिवाळीच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांने कुटुंबासोबत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (vignesh shivan nayanthara twins baby)

सध्या विघ्नेशची पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये विघ्नेशने जुळ्या मुलांची एक झलक दाखवली आहे. पण त्यांने दोघांचा चेहरा मात्र लपवला आहे. विघ्नेशच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

9 ऑक्टोबर रोजी विघ्नेशनं ट्विटरवर मुलांचे अनेक फोटो शेअर केले होते. यामध्ये त्यानं चाहत्यांना जुळे मुलगे झाल्याची आनंदाची दिली. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिले की, 'नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्हाला जुळे मुलगे झाले आहेत. आपल्या पूर्वजांच्या सर्व प्रार्थना आणि आशीर्वाद या दोन जुळ्या मुलांच्या रूपाने मिळाली आहेत. आता तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याची पोस्ट त्याने केली. (nayanthara vignesh shivan twin babies)

नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचं लग्न 9 जून 2022 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांच्या लग्नाला कुटुंब आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. याशिवाय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारही या लग्नात पोहोचले होते. (nayanthara vignesh shivan marriage)