राजकुमार-श्रद्धाच्या 'स्त्री'ची पहिल्या दिवसाची कमाई

दिग्दर्शक म्हणून अमर यांचा हा पहिलाच सिनेमा आहे

Updated: Sep 1, 2018, 01:10 PM IST
राजकुमार-श्रद्धाच्या 'स्त्री'ची पहिल्या दिवसाची कमाई title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री' हा सिनेमा शुक्रवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेतज्ज्ञांनी या सिनेमाला चांगली रेटिंग दिलीय. तर दुसरीकडे दर्शकांनाही हॉरर कॉमेडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलीय. पहिल्याच दिवशी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. पहिल्याच दिवशी या सिनेमानं 6.82 करोड रुपये वसूल केलेत. या सिनेमात अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅर्नजी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. 

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे ट्विटरवरून शेअर केलेत. 'स्त्री पहिल्याच दिवशी अपेक्षांवर खरी ठरतेय. पहिल्याच दिवशी या सिनेमानं 6.82 करोड रुपयांचा व्यवसाय केलाय... विकेन्ड़ला हा आकडा आणखीन वाढू शकतो' असं त्यांनी म्हटलंय. 

या सिनेमाची टॅग लाईन आहे 'मर्द को दर्द होगा'... या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अमर कौशिक यांनी.. दिग्दर्शक म्हणून अमर यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.