मुंबई : सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणाने नवं वळण घतेलं आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ होत असताना दिसत आहे. आता कंपनीचे तीन निर्माते आणि गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) विरूद्ध मुंबईच्या मालाड मालवानी पोलीस स्थानकात तक्रार FIR दाखल करण्यात आली आहे. गहना वशिष्ट अभिनेत्री आणि निर्माती आहे आणि तिने हॉटशॉटसाठी काही दिवसांपुर्वी एक कॉन्टेंट तयार केला.
फिर्यादी महिला एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हॉटशॉट्स (HotShots) ऍपसाठी पॉर्न शूट करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. असं अभिनेत्रीने तक्रारीत सांगितलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी मुंबई पोलिस ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
राज कुंद्राच्या अडचणीत वाढ
अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला.
काय आहे संपूर्ण प्रकरण
मुंबई क्राईम ब्राँचने 19 जुलै रोजी 2 तासांच्या चौकशीनंतर राज कुंद्राला अटक केली. अश्लिल चित्रपटांचं चित्रीकरण आणि ऍपवर अश्लिल चित्रपट प्रदर्शित केल्या प्रकरणी राजला अटक झाली. या प्रकरणात राज मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे. तर पॉर्नोग्राफी प्रकरणातील अन्य आरोपींना देखील अटक करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.