शेवटी त्याने श्रद्धा कपूरला प्रपोज केलंच! सोशल मीडियावर रंगल्या लग्नाच्या चर्चा

श्रद्धाचा असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत. ज्यामध्ये तिला एक मिस्ट्री बॉय तिला प्रपोज करताना दिसत आहे. श्रद्धाच्या प्रपोजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Updated: Aug 2, 2023, 04:24 PM IST
शेवटी त्याने श्रद्धा कपूरला प्रपोज केलंच! सोशल मीडियावर रंगल्या लग्नाच्या चर्चा title=

मुंबई : सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. मग याला सेलिब्रिटी अपवाद नाही. काही सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकत आहेत तर काही सेलिब्रिटींच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच अभिनेत्री श्रद्धा कपूर कधी करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष आहे. अनेकदा श्रद्धाच्या लग्नाच्या अफवाही उडाल्याच्या आपण पाहिल्या आहेत. मात्र आता आम्ही तुम्हाला श्रद्धाचा असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत. ज्यामध्ये तिला एक मिस्ट्री बॉय तिला प्रपोज करताना दिसत आहे. श्रद्धाच्या प्रपोजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

सगळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसणारी ही व्यक्ती नेमकी आहे कोण अशी चर्चाही रंगताना दिसत आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी ही व्यक्ती श्रद्धाचा चाहता आहे. ज्याने श्रद्धाला नुकतच एअरपोर्टवर प्रपोज केलं आहे. श्रद्धाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

अभिनेत्रीचे एक्सप्रेशन पाहून सोशल मीडियावर युजर्सने कमेंट्सचा वर्षाव सुरू केला असून ते अभिनेत्रीचं कौतुक करताना थकत नाहीयेत. आता या क्यूट एक्सप्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. श्रद्धा कपूर शेवटची रणबीर कपूरसोबत तू झुठी मैं मकर या चित्रपटात दिसली होती, ज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.  श्रद्धा कपूरचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ एअरपोर्टचा आहे. ज्यामध्ये तिने पांढरा शॉर्ट आणि फुल स्लीव्हज टॉप परिधान करून दिसली. तिने स्नीकर्ससह या लुकला पुर्ण केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर युजर्सने कमेंट्सचा वर्षाव केला आहे, एका युजरने कमेंट करत कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे की, शक्ती कपूरच्या फॅन्सने लाईक करा. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, शाळेत जा अभ्यास कर एवढ्या लहान वयात सेलिब्रिटीला पटवत आहेस. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, ती खूपच क्यूट आहे. तर अजून एका युजरने कमेंट करत म्हटलंय की, काय मिळालं गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करुन तुला सेल्फ रिस्पेक्ट आहे की, नाही. तर अजून एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं की, उफ्फ लव यू श्रद्धा. अभिनेत्रीचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ विरल बयानीने त्याच्या इंस्टाग्राम पेडवर शेअर केला आहे.