ऋषी कपूरच्या फॅन्ससाठी खुशखबर, 'या' आजारावर केली मात

ऋषी कपूर यांचा मित्र आणि सिनेनिर्माता राहुल रवैल यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून ही बातमी दिलीय

Updated: Apr 30, 2019, 02:50 PM IST
ऋषी कपूरच्या फॅन्ससाठी खुशखबर, 'या' आजारावर केली मात title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. परंतु, ऋषी कपूर यांना नेमकं काय झालंय? हा प्रश्न त्यांच्या फॅन्सना सतावत होता. ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबीयांनीही कधी याबद्दल खुलासा केला नव्हता. आता मात्र ऋषी कपूर यांच्या फॅन्सला त्यांच्याच एका मित्रानं खुशखबर दिलीय. 

ऋषी कपूर हे गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झगडत होते. आता मात्र त्यांनी या जीवघेण्या आजारावर मात केलीय. ऋषी कपूर यांचा मित्र आणि सिनेनिर्माता राहुल रवैल यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून ही बातमी दिलीय. 

'चिंटू आता पूर्णत: कॅन्सरमुक्त झालाय' असं राहुल रवैल यांनी आपला आणि ऋषी कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलंय. 

गेल्या वर्षी अनेक बॉलिवूड कलाकार कॅन्सरच्या विळख्यात अडकल्याचं उघडकीस आलं होतं. त्यापैंकीच एक ऋषी कपूरही होते. इरफान खान, सोनाली बेंद्रे यांनाही कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. परंतु, 
आता या दोन्हीही कलाकारांनी कॅन्सरवर मात केल्याचं पाहायला मिळतंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

That amazing feeling in your lows when there is Positivity Happiness Love and that Wink!!!!

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

ऋषी कपूर गेल्या वर्षी १०२ नॉट आऊट, मुल्क या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. आजार झाल्याचं समजल्यानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर त्यांच्यासोबत धीटपणे उभे राहिले. यावेळी अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री आणि रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भट्टही या कुटुंबासोबत दिसली.