मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत काम करणाऱ्या फातिमाला दंगल या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, फातिमा बाल कलाकार म्हणूनही चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र चित्रपटसृष्टीत काम करणं तिच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. फातिमाने सांगितलं होतं की, तिला ईथे काम करण्यासाठी शारिरीक संबध ठेवण्याची मागणी होत होती.
काही काळापूर्वी फातिमाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. तिने सांगितलं की ती अशा परिस्थितीत गेली आहे जिथे तिला सांगण्यात आलं आहे की नोकरी मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शारिरीक संबध ठेवणे आहे. फातिमा म्हणाली, 'मी अशा परिस्थितीतून गेले आहे जिथे मला सांगण्यात आलं आहे की, मी शारिरीक संबध ठेवले तरच मला काम मिळेल. अनेकवेळा तिच्याकडून काम हिसकावण्यात आल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं.
याशिवाय फातिमाने असंही सांगितलं आहे की, वयाच्या अवघ्या तीसऱ्या वर्षी ती लैंगिक शोषणाची शिकार झाली होती. फातिमा सना शेख म्हणाली, 'जेव्हा मी फक्त तीन वर्षांची होते, तेव्हा माझा विनयभंग झाला. लैंगिक शोषण हा एक कलंक आहे म्हणूनच स्त्रिया आयुष्यात कधीच या अत्याचाराबद्दल बोलत नाहीत पण मला आशा आहे की, आज जग बदललं आहे. त्याबाबत अधिक जनजागृती झाली आहे. त्याबद्दल बोलू नका, असं पूर्वी सांगितलं होतं. लोक याचा वेगळा विचार करतील.
फातिमा सना शेखने दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटानंतर ती आमिर खानसोबत ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटात दिसली. यात कतरिना कैफ आणि अमिताभ बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला असला तरी. याशिवाय ती 'लुडो' आणि 'सूरज पर मंगल भारी' या चित्रपटातही दिसली होती.