Govinda Birthday : गोविंदा चा जन्म झाल्यानंतर वडिलांनी दिला कुशीत घेण्यास नकार!

Govinda चा आज 21 डिसेंबर रोजी 59 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसा निमित्तानं आपण त्याच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Updated: Dec 21, 2022, 03:03 PM IST
Govinda Birthday : गोविंदा चा जन्म झाल्यानंतर वडिलांनी दिला कुशीत घेण्यास नकार! title=

Happy Birthday Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गोविंदा हा त्याच्या डान्स स्टाइलसाठी ओळखला जातो. आज गोविंदा त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Govinda's 59th Birthday) गोविंदानं जवळपास 165 चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदान बॉलिवूडमध्ये जेव्हा एंट्री केली त्यावेळा त्याला आई-वडील कोणाचाही पाठिंबा नव्हता. खरंतर गोविंदाचे वडील हे स्वत: एक अभिनेता आणि आई गायिका होत्या. दरम्यान, जेव्हा गोविंदाचा जन्म झाला त्यावेळी त्याची आई आणि वडिलांच्या नात्यात अंतर येऊ लागले होते. पती-पत्नीच्या नात्यात आलेल्या या अंतरासाठी गोविंदा जबाबदार असल्याचे त्याच्या वडिलांना वाटायचे. यामुळेच जेव्हा गोविंदाचा जन्म झाला तेव्हा त्यांनी गोविंदाला हातात घेतले सुद्धा नाही. 

गोविंदाचा जन्म हा 21 डिसेंबर 963 साली झाला होता. गोविंदाचा जन्म हा मुंबईत झाला. गोविंदाच्या वडिलांचे नाव अरुण होते. गोविंदाचे वडील हे महबूब खान यांच्या औरत या चित्रपटासाठी ओळखले जातात. गोविंदाच्या जन्मच्या काही दिवसांपूर्वी त्याची आई साध्वी झाली होती. त्यामुळे त्याच्या आई-वडील एकत्र राहत असले तरी त्यांच्यात अंतर आले. साध्वी झाल्यानंतर गोविंदाच्या आईनं त्याच्या वडिलांपासून अंतर ठेवले. यामुळे गोविंदाच्या वडिलांना त्याचा राग आला. दरम्यान, जेव्हा गोविंदाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला कुशीत घेण्यास नकार दिला. इतकंच नाही तर प्रेग्नंट असल्यामुळे गोविंदाच्या आईनं साध्वी होण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या वडिलांना वाटू लागले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लग्नाच्या एक वर्षानंतर रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर 'महादेव' फेम Mohit Raina चं मोठं वक्तव्य

असं करायला नको, असं करू नका अशा बऱ्याच गोष्टी सांगत गोविंदाच्या वडिलांची घरच्यांनी समजूत काढली. त्यानंतक त्याचा वडिलांचा राग गेला आणि त्यांनी गोविंदाला कुशीत घेतले. गोविंदाचे कुटुंब हे आधी मुंबईतील उच्च भ्रू परिसरातील एका बंगल्यात राहत होते. पण जेव्हा त्याचे वडील अरुण यांनी चित्रपटांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे गमावले, तेव्हा त्यांना बंगला विकावा लागला. आता जायचं कुठे तर ते विरारमध्ये एका छोट्या घरात शिफ्ट झाले. येथेच गोविंदाचा जन्म झाला. गोविंदा आणि त्याचे भावंड मिळून 6 आहेत. गोविंदा हा सगळ्यात लहान होता. त्याला घरातले प्रेमानं चिची म्हणून हाक मारायचे. चिची म्हणजे इंग्रजीत लिटल फिंगर आहे. (Govinda's family shited to virar over lose in film)