फॅन्टसी, ड्रामा आणि रोमान्स, आणखी एका बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज

ओटीटीवर आणखी एक बोल्ड वेब सीरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Updated: Jun 21, 2022, 09:18 PM IST
फॅन्टसी, ड्रामा आणि रोमान्स, आणखी एका बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : सोशल मीडियावर चर्चेत राहिलेल्या दुनाली वेब सीरीजचा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. दुनाली सीझन 2 भाग 3 ही उल्लू वेब सिरीज चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्रींनी बोल्ड सीन्स दिले आहेत.

प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Ullu वर आणखी एक बोल्ड वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुनाली सीझन 2 भाग 3 चा ट्रेलर सकाळी 11 वाजता यूट्यूबवर रिलीज केला आहे. सध्या उल्लू अॅप दर आठवड्याला वेब सिरीज रिलीज करते.

दुनाली सीझन 2 भाग 3 ही एक भारतीय वेब सिरीज आहे. ज्यामध्ये फॅन्टसी, ड्रामा आणि रोमान्स पाहायला मिळणार आहे.

या वेब सिरीजचे सर्व भाग तुम्ही ullu अॅपवर ऑनलाइन पाहू शकता. 24 जूनला ही वेब सीरीज रिलीज होणार आहे.

दुनाली सीझन 2 चा हा तिसरा भागात समीर एका मुलीच्या प्रेमात पडतो जिचे नाव दिशा आहे. दिशा समीरला तिच्या आईला भेटायला घरी घेऊन जाते. समीरला तेव्हा कळते की दिशाची आई मुंबईची प्रसिद्ध गँगस्टर चांदनी आहे.