मुंबई : हॉलिवूड गायिका Katy Perry सोबत भर कॉन्सर्टमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अमेरिकन आयडॉल शोमध्ये तिच्या परफॉर्मन्स दरम्यान Katy एका मेजर oops moment ची बळी पडली. परफॉर्मन्सदरम्यान तिची चामड्याची पँट मागून फाटली आणि तिथे बसलेले प्रेक्षक तिच्याकडे बघतच राहिले. कॅटीच्या या वॉर्डरोब मालफंक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अमेरिकन आयडॉलच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये ही घटना घडली. ती तिचं 'टीनएज ड्रीम' हे हिट गाणं गात होती. तिचा परफॉर्मन्स पूर्ण मनोरंजनात ठेवण्याच्या नादात, कॅटी मागे झुकली आणि तिची पॅंट सगळ्यांसमोर फाटली. हे पाहून प्रेक्षकांनाही चांगलाच धक्का बसला. Katy च्या या फजितीवर प्रेक्षकही हसू आवरु शकले नाही.
अमेरिकन आयडॉल शोमधील कॅटीचे सहकारी जज लिओनेल रिची आणि ल्यूक ब्रायन यांनाही हसू आवरता आलं नाही. ते हसत म्हणाले, 'कॉन्सर्ट अधिकृतपणे संपली आहे.' पण गंमतीची गोष्ट म्हणजे फॅशनच्या या आपत्तीमुळे Katy ने तिचा परफॉर्मन्स थांबवला नाही, तर ती वेळ तिने व्यवस्थितपणे हाताळली. Katy ने तिथल्या क्रू मेंबर्सना विचारलं, 'मला टेप मिळू शकते का?' त्यानंतर क्रू मेंबर्सनी तिला टेप आणून दिली आणि यानंतर Katy ने पॅन्टवर टेप चिकटवून तिचा परफॉर्मन्स पूर्ण केला.
Katy ला अशा oops moment ला बळी पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ती 2018 मध्येही अशा प्रकारच्या वॉर्डरोब मालफंक्शनला बळी पडली आहे. त्याचबरोबर कॅटीने तिच्या पॅन्टचा फाटलेला भाग टेपने लपवून ठेवला होता.