प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीची भर हॉटेलमध्ये चोरी, व्हिडिओ कॅमेरात कैद

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चहा प्यायला रेस्टॉरंटमध्ये गेली होती.

Updated: Jan 11, 2022, 08:14 PM IST
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीची भर हॉटेलमध्ये चोरी, व्हिडिओ कॅमेरात कैद title=

मुंबई : रेस्टॉरंटमधून अचानक काही वस्तू चोरतानाचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, सेलिब्रिटी बनल्यानंतरही काही स्टार्स असे आहेत जे रेस्टॉरंटमध्ये जाऊन चोरी करतात. नुकताच याचा पुरावा समोर आला आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चहा प्यायला रेस्टॉरंटमध्ये गेली होती. मात्र यावेळी या अभिनेत्रीने तिथून साखर चोरली आहे.

रेस्टोरंटमध्ये पोहचली चहा प्यायला
टीना दत्ताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रेस्टॉरंटमध्ये तिच्या ऑर्डरची वाट पाहत असल्याचं तुम्हाला दिसेल. चहा समोर येताच ती खूप खूश होते.

चोरली साखर
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, टीना दत्ता चहा पिते आणि या यानंतर ती हसते आणि गुपचूप भांड्यात ठेवलेलं साखरेचं पॅकेट बॅगमध्ये ठेवते.

व्हिडिओ शेअर करत सांगितली ही गोष्ट
टीना दत्ताने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलं, 'मी हे अजिबात करत नाही, पण जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला हसू येईल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीना दत्ताच्या प्रत्येक पोस्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तिचे चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर कमेंट करून अभिनेत्रीचे कौतुकही करतात. अभिनेत्रीच्या या लेटेस्ट पोस्टवर सध्या लोक जोरदार कमेंट करत आहेत. टीनाला 'उत्तरन' या मालिकेत साकारलेल्या इच्छा या व्यक्तिरेखेपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत ओळख मिळाली.