प्रसिद्ध अभिनेत्याचा गोव्यात मोठा अपघात; गंभीर जखमी

आपल्या कुटुंबासह गोव्यात सुट्टी घालवणाऱ्या अभिनेत्याला एडवेंचर करणं भारी पडलं

Updated: Jun 21, 2022, 08:56 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्याचा गोव्यात मोठा अपघात; गंभीर जखमी title=

मुंबई : कन्नड अभिनेता दिगनाथ अपघातात गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, आपल्या कुटुंबासह गोव्यात सुट्टी घालवणाऱ्या दिगनाथला एडवेंचर करणं भारी पडलं आणि त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याच्या बातम्या आहेत. अभिनेत्याला प्रथम गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता अभिनेत्याला तातडीने विमानातून बंगळुरूला नेण्यात आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी दुखापत झाली
रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, तो दोन दिवसांपूर्वी जखमी झाला होता. त्यानंतर त्याला गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र आता त्याला गोव्याहून बेंगळुरूला विमानाने नेण्यात आलं आहे. अभिनेता दिगनाथचं वय 37 वर्षे असल्याचं सांगितलं जात असून, तो या अपघाताचा बळी ठरला आहे.

अभिनेता दिगनाथला दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल केलं जात असताना, आणखी एका कन्नड अभिनेत्याचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यानंतर इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. सतीश वज्र असे या अभिनेत्याचं नाव असून तो साऊथमधील प्रसिद्ध स्टार आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह त्याच्या घरातून जप्त केल्याचं बोललं जात आहे. 

त्याचवेळी जवळच्या व्यक्तीवर खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिनेत्याच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याचवेळी पत्नीच्या मृत्यूनंतर अभिनेत्याच्या या निर्दयी हत्येने त्याच्या चाहत्यांना हादरवून सोडलं आहे.