आचार्य अत्रे यांच्या कन्या लेखिका मीना देशपांडे यांच कोरोनामुळे निधन

मीना देशपांडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

Updated: Sep 7, 2020, 02:53 PM IST
आचार्य अत्रे यांच्या कन्या लेखिका मीना देशपांडे यांच कोरोनामुळे निधन  title=

मुंबई : ज्येष्ठ लेखिका आणि आचार्य अत्रे यांची कन्या मीना देशपांडे यांचे जॉर्जिया येथे निधन झाले आहे. देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाची लागण झाल्यामुळे मीना देशपांडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. 

कोरोनाची लागण होण्याअगोदर मीना देशपांडे यांची प्रकृती उत्तम होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉक्टरांची सर्वतोपरी काळजी घेतली, अशी माहिती मीना देशपांडे यांच्या मुलाने हर्ष देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Indian (Marathi) writer and stage producer Meena Deshpande passed away today in Augusta, Georgia. She was the daughter...

Posted by Harsha Deshpande on Sunday, September 6, 2020

मीना देशपांडे यांनी मुंबई विद्यापीठातून फिलॉसॉफी विषयात पदवी घेतली. यानंतर त्या मराठी नाट्यसृष्टीकडे वळल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आचार्य अत्रेंची स्टेज कंपनी 'अत्रे थिएटर' सांभाळली. या अत्रे थिएटरमार्फत देशभरात हजारो नाटकं सादर केली जात असतं. 

My mother Meena Deshpande passed away today in Augusta Georgia. She was a victim of the horrible virus that is...

Posted by Harsha Deshpande on Sunday, September 6, 2020

'पश्चिम गंध' हे त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक. युरोपात प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या महिला भारती.