'याद आयेंगे ये पल...' भरभरून जगायला शिकवणारा KK अनंतातविलिन

'जिंदगी दो पल की...'  तरुणीईनं गमावला मैत्रीवर प्रेम करायला शिकवणारा हक्काचा मित्र...   

Updated: Jun 2, 2022, 03:00 PM IST
'याद आयेंगे ये पल...' भरभरून जगायला शिकवणारा KK अनंतातविलिन title=

मुंबई : शेवटच्या परफॉर्मन्सनंतर केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नत काळाच्या पडद्याआड गेला. बुधवारी केकेने अखेरचा श्वास घेतला. केकेने चाहते आणि कुटुंबासोबत व्यतीत केलेले क्षण कधीही न विसरता येणारे आहेत. 'याद आयेंगे ये पल...' असं म्हणारा केके अनंतातविलिन झाला आहे. केकेचं अंतिमदर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी गायकाच्या राहत्या घरी पोहोचले. चाहत्यांना देखील केकेच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. 

केके आज आपल्यात नसला, तरी त्याचे विचार आणि गाण्यांमधून तो कायम आपल्यासोबत असणार आहे. कारण कलाकाराचं कधीही निधन होत नाही, त्यांची कला कायम येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणार आहे. 

केके कोलकात्यात एका कॉन्सर्टसाठी गेला होता. पण कॉन्सर्ट संपल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो कोसळले. प्रकृती ढासळ्यानंतर तात्काळ केकेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी केकेला मृत घोषित केलं. वयाच्या 53 व्या वर्षी केकेने जगाचा निरोप घेतला आणि संगीत विश्वाचा एक धडा कायमचा संपला. 

केके हा बॉलीवूडचा टॉप-क्लास गायक होता ज्याने 11 भाषांमध्ये गाणी गायली. ज्यांच्या मधुर आवाजाने नेहमीच सर्वांच्या हृदयावर राज्य केले होते. 90 च्या दशकात केकेने रोमँटिक, मैत्री आणि प्रेमावर आधारित अनेक गाणी गायली होती आणि ती गाजलीही होती. 

अशा या प्रसिद्ध गायकाला 'झी २४ तास' कडून भावपूर्ण श्रद्धांजली...