KK च्या मृत्यूचं कारण अखेर समोर, आज होणार अंत्यसंस्कार

'हम रहे या ना रहे...' आपल्या आवाजाने जगाला भावुक करणाऱ्या केकेचं 'या' कारणामुळे निधन, आज होणार अंत्यसंस्कार   

Updated: Jun 2, 2022, 08:55 AM IST
KK च्या मृत्यूचं कारण अखेर समोर, आज होणार अंत्यसंस्कार  title=

मुंबई : 'हम रहे या ना रहे...' असं म्हणत अनेकांना जगण्याची उमेद देणाऱ्या प्रसिद्ध बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतने जगाला अखेरचा निरोप दिला. केकेच्या निधनानंतर बॉलिवूड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गायक केके यांच्यावर आज मुंबईत वर्सोवात अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत केकेवर अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंगर केके यांचं पार्थिव बुधवारी कोलकात्यातून मुंबईत आणलं.

वर्सोवात अंत्यदर्शनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. केकेचं अंतिमदर्शन चाहत्यांना मुंबाईत घेता येणार आहे. KK च्या मृत्यूचं कारण अखेर समोर प्रसिद्ध गायक केकेचा मृत्यू हार्ट अटॅकमुळेच झाल्याचं पोस्ट मॉर्टेमच्या प्राथमिक अहवालात पुढे आल आहे. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये काहीही अनैसर्गिक आढळून आलेलं नाही. मात्र संपूर्ण अहवाल येण्यास अजून 72 तास लागणार आहेत. त्यामुळे अंतिम अहवालातच मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार आहे.

केकेचा शेवटाचा व्हिडीओ प्रसिद्ध गायक केकेचा ग्रँड हॉटेलमधील अखेरचा व्हिडिओ समोर आलाय. कॉन्सर्ट संपवून केके हॉटेलमधील लॉबीतून आपल्या रुमकडे जाताना दिसतोय.

केकेची ही दृश्य हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीत. केके या व्हिडिओत अस्वस्थ असल्याचं दिसतंय. त्याच्यासोबत एक व्यक्तीही आहे. ही व्यक्ती त्याच्यासोबत स्टेजवरही होती.