घटस्फोटानंतर समंथाच नागाबाबतीत मोठं वक्तव्य; म्हणाली...

'कॉफी विथ करण' 7 या गॉसिप शोच्या सीझनचा तिसरा एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. 

Updated: Jul 22, 2022, 02:49 PM IST
घटस्फोटानंतर समंथाच नागाबाबतीत मोठं वक्तव्य; म्हणाली... title=

मुंबई : 'कॉफी विथ करण' 7 या गॉसिप शोच्या सीझनचा तिसरा एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. यावेळी अक्षय कुमार आणि समंथा रुथ प्रभू हे पाहुणे कलाकार म्हणून आले होते. करण जोहरसह समंथा आणि अक्षय कुमार यांनी शोमध्ये खूप मसाला दिला. मात्र, चाहते नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर सामंथाच्या प्रतिक्रियेची सर्वाधिक वाट पाहत होते. या शोमध्ये समंथाही नागाविषयी मोकळेपणाने बोलली.

घटस्फोटानंतर हार्ड फिलिंग्स
यादरम्यान सामंथा जे काही बोलली, त्यावरून हे स्पष्ट होतं की, घटस्फोटानंतर नागा आणि सामंथा इतर सेलिब्रिटींसारखे चांगले मित्र नाहीत. करण जोहर तिच्या घटस्फोटावर सामंथाशी बोलला आणि म्हणला की, तुझ्या बाबतीत मला वाटतं की तू पहिली व्यक्ती होतीस जिने तिच्या पतीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला.

यावर समंथा करण जोहरला अडवते आणि दुरुस्त करताना पती नव्हे तर 'एक्स-हसबंड' असं म्हणते. करण जोहरने तिला पुढे विचारलं की समंथाला नागा चैतन्यबद्दल काही कठोर भावना आहेत का? यावर समंथाने उत्तर देत सांगितलं जे खूप व्हायरल होत आहे.

नागा चैतन्यशी मैत्री नाही
समंथाने होय असं उत्तर दिलं आणि म्हणाली, 'सध्या आमच्या मनात एकमेकांबद्दल तीव्र भावना आहेत. म्हणजे आता जर तुम्ही आम्हा दोघांना एका खोलीत बंद केलं तर तुम्हाला आमच्यापासून  धारदार गोष्टी लपवाव्या लागतील. सध्या परिस्थिती चांगली नाही. कदाचित भविष्यात काहीतरी बदलेल.

काही वर्षे डेट केल्यानंतर समंथा रुथ प्रभूने २०१७ मध्ये नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं. पण 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नागा यांचा घटस्फोट झाला.  करण जोहरने समंथाला विचारलं की, जेव्हा ती नागा चैतन्यपासून वेगळी झाली तेव्हा तिला ट्रोल होण्याची भीती वाटत होती का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रत्युत्तरात सामंथा म्हणाली की, तिचं आयुष्य चाहत्यांसमोर उघडं ठेवणं ही तिची निवड होती आणि म्हणून ती याबद्दल तक्रार करू शकत नाही कारण सर्व काही पारदर्शक ठेवण्याचा तिचा निर्णय होता. म्हणूनच नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यावर जे घडलं त्याबद्दल ती तक्रार करू शकत नाही किंवा दुःखी होऊ शकत नाही. कारण तिच्या आयुष्यात लोकांनी आणि चाहत्यांनी खूप गुंतवणूक केली होती.