ईशा गुप्ताचं जीक्यू मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट

आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.

Updated: Nov 9, 2017, 10:14 AM IST
ईशा गुप्ताचं जीक्यू मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट title=
Image Credit Esha Gupta Instagram

मुंबई : आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.

गेल्यावेळी ईशा आपल्या न्यूड फोटोंमुळे वादात सापडली होती. सोशल मीडियातून तिच्यावर टीका झाली होती. आता पुन्हा फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आपल्या सिनेमातील भूमिकांपेक्षा बोल्ड फोटोंमुळेच ही अभिनेत्री चर्चेत राहते हे पुन्हा दिसून आलंय. 

 

 #gq

A post shared by Esha Gupta (@egupta) on

 

Don't look back.. unless it's for the camera.. #gq

A post shared by Esha Gupta (@egupta) on

‘बादशाहो’ हा ईशाचा नुकताच येऊन गेलेला सिनेमा. पण ना या सिनेमाला हवं तसं यश मिळालं, ना ईशाच्या भूमिकेला. आता ईशाने आता जीक्यू या जगप्रसिद्ध मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. हे सर्व फोटो स्विमिंग पूलमधील आहेत. 

 

November says hello.. #gq

A post shared by Esha Gupta (@egupta) on

ईशा गुप्ता ही बोल्ड आणि बिनधास्त भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलंय. पण तिला अजूनही हवं ते यशं मिळू शकलेलं नाहीये. अजूनही ती मुख्य अभिनेत्रींमध्ये गणली जात नाहीये. त्यामुळे कदाचित तिने नेहमी चर्चेत राहण्यासाठी हा बोल्ड फोटोंचा मार्ग निवडला असावा. पण लोकांच्या मनात घर करण्यासाठी चांगल्या भूमिकाही तिने करायला हव्या हे तिला कुणीतरी सांगणे गरजेचे आहे.