'तुला दोन आई आहेत ना?' ईशा देओलला चौथी असताना मैत्रिणींनी विचारलेला प्रश्न; स्वत: खुलासा करत म्हणाली...

Esha Deol's Friend ask her About Her 2 Mothers : ईशा देओलला जेव्हा चौथीत असताना जेव्हा मैत्रिणीनं विचारला होता दोन आई असण्यावर प्रश्न

दिक्षा पाटील | Updated: Nov 9, 2024, 12:16 PM IST
'तुला दोन आई आहेत ना?' ईशा देओलला चौथी असताना मैत्रिणींनी विचारलेला प्रश्न; स्वत: खुलासा करत म्हणाली... title=
(Photo Credit : Social Media)

Esha Deol's Friend ask her About Her 2 Mothers : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ईशा देओल ही तिच्या वडिलांसोबत असलेल्या नात्यामुळे नेहमीच स्पष्टपणे बोलताना दिसते. यावेळी ईशानं खुलासा केला आहे की तिची आई आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाविषयी सांगितलं, जेव्हा ती चौथीत होती. ईशानं हे सगळं हेमा मालिनी यांच्यावर असलेल्या बायोग्राफीमध्ये त्यांच्या कुटुंबातील डायनॅमिक्सविषयी सांगितलं. 

ईशा देओलनं 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल बाय राम कमल मुखर्जी' बायोग्राफीमध्ये सांगितलं. ईशानं यावेळी सांगितलं की तिला तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाविषयी तेव्हा कळलं जेव्हा तिच्यासोबत शाळेत असलेल्या एका मुलीनं तिला विचारलं की तुला दोन आई आहेत ना? तर ईशाला त्या मुलीनं विचारलेल्या प्रश्नावर आश्चर्य झालं मात्र, तिनं लगेच याला खोटं काहीही मूर्खपणा असल्याचं सांगत म्हटलं की तिची फक्त एकच आहे आहे. मात्र, हा प्रश्न तिच्या मनात घर करून राहिला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ईशानं सांगितलं की "जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा त्यांनी हेमाला प्रश्न विचारला की त्यावेळी माझ्या आईनं मला खरं सांगण्याचा निर्णय घेतला. फक्त विचार करा आम्ही चौथीत होतो आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीविषयी काही माहित नव्हतं. आताची मुलं खूप हुशार झाले आहेत आणि मला त्यावेळी कळलं की माझ्या आईनं अशा एका व्यक्तिशी लग्न केलं आहे ज्याचं आधीच कोणत्या महिलेशी लग्न झालं होतं आणि त्याचं एक कुटुंब देखील आहे. पण खरं सांगायचं झालं तर मला कधीच या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. आजही मला वाटतं की त्यात काही चूक नाही. मी माझ्या आई-वडिलांना त्याचं संपूर्ण क्रेडिट देते की त्यांनी मला कधीच अस्वस्थ वाटू दिलं नाही."

ईशानं पुढे कुटुंबाच्या बॉन्डविषयी सांगितलं की 'धर्मेंद्र रोज त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्यासोबत जेवण करतात पण ते कधीच थांबत नाहीत. जेव्हा मी लहाण होते तेव्हा मी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घरी जायचे. तिथे मी दोघं आई-वडिलांना एकत्र पाहायचे. तेव्हा मला वाटलं की वडिलांचं असं समोर राहणं हे साधारण आहे. पण आम्हाला अशा प्रकारे तयार केलं आहे की त्या सगळ्याचा आमच्यावर परिणाम झाला नाही. मी माझ्या भूमिकेमुळे खूप आनंदी आहे आणि माझं माझ्या वडिलांवर खूप प्रेम करायचे.'