बॉलिवूडच्या 'या' ३ मोठ्या व्यक्ती ईडीच्या जाळ्यात, ई़डीचं चौकशीसाठी आमंत्रण

ईडीची नजर सध्या बॉलिवूडच्या तीन नावांवर आहे.

Updated: Jun 23, 2021, 07:50 PM IST
 बॉलिवूडच्या 'या' ३ मोठ्या व्यक्ती ईडीच्या जाळ्यात, ई़डीचं चौकशीसाठी आमंत्रण title=

मुंबई : ईडीची नजर सध्या बॉलिवूडच्या तीन नावांवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबच्या एमएलएच्या लग्नाच्यावेळी ड्रेसे विक्रीत फसवणूक केल्याचा तपास सुरू आहे. या लग्नामध्ये  मनीष मल्होत्रा, सब्यसांची आणि रितु कुमार यांच्यावर ड्रेसच्या पैशांचा गैरवापर केल्याचा संशय ईडीला आला आहे.

चौकशीसाठी ईडीने या तिन्ही डिझाइनर्सना नोटिसा पाठवल्या आहेत. हे तिघंही बॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझाइनर आहेत. देशातील सर्वात मोठे सुपरस्टार्स यांनी डिझाईन केलेल कपडे परिधान करतात. हे प्रकरण हाय प्रोफाइल असल्याचं दिसत आहे.

काय आहे प्रकरण 
सूत्रांनुसार पंजाबमधील एक आमदार नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे चर्चेत होते आणि ईथे पार पडलेल्या एका लग्नामुळे देखील ते चर्चेत होते. या लग्नात त्यांनी कोट्यावधी रुपये उढवले. यातल्या काही खर्चाचा हिशोब देखील नाही.

तक्रारीनंतर ईडीने आमदारांच्या जागेवर छापा टाकला. त्यावेळी तिथे काही हिशोबाच्या स्लिप्स सापडल्या. ज्यात असं लिहिलं आहे की, मनीष मल्होत्रा, रितु कुमार आणि सब्यसांची यांना ड्रेसेजसाठी पैसे दिले जातील. याची सत्यता जाणून घेण्यासाठी ईडीने या तिघांनाही चौकशीत सामील होण्यासाठी सांगितलं आहे.

21 जूनला दिल्लीत आमदाराची चौकशी करण्यात आली आहे. टॅक्सचे पैसे वाचवण्यासाठी या ड्रेसचं पेमेंन्ट कॅश पेमेंन्ट केलं गेलं नसेल ना? ईडी त्यांना असे अनेक इतर प्रश्न विचारू शकते. अर्थात इतकी मोठी नावं येताच प्रत्येकाचे डोळे आता या चौकशीकडे लागले आहेत.

कोण आहे मनीष मल्होत्रा​​?
मनीष मल्होत्रा ​​देशातील सर्वात मोठा फॅशन डिझायनर आहे. मनिष करण जोहरचा खास मित्र आहे.  मनीष धर्मापासून बऱ्याच बड्या प्रॉडक्शन हाऊसच्या सिनेमांमध्ये कलाकारांचे ड्रेस डिझाइन करतो. त्याच्याकडे देशातील अनेक शहरांमध्ये विशेष शोरूम आहेत. ज्यामध्ये लाखो रुपयांच्या कपड्यांची विक्री केली जाते. मनीषचं नाव ज्या कपड्यांशी संबंधित आहे त्या कपड्यांची ब्रँड व्हॅल्यू आपोआप वाढते. 

साड्यांसाठी प्रसिद्ध आहे सब्यसंची
सब्यसांची साडीचं कलेक्शन जगभरात प्रसिद्ध आहे. विद्या बालन पासून अनेक बड्या अभिनेत्री त्याच्या शोमध्ये रॅम्प वॉक करतात. त्याच्या साड्यांची किंमत 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. हेच नाव रितु कुमार यांचेही आहे.