मुंबई : कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) हे छोट्या पडद्यावरील कपल्सपैकी एक आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दाम्पत्याविरुद्ध 200 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष यांना तुरुंगात जावे लागले होते. सध्या भारती आणि हर्ष जामिनावर बाहेर आहेत. एनसीबीनं या दाम्पत्याच्या घरावरही छापा टाकला होता, जिथे तपासादरम्यान गांजा जप्त केला होता. यानंतर चौकशीत कॉमेडियनने ड्रग्ज घेतल्याची कबुलीही दिली होती.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचे हे प्रकरण 2020 सालचे आहे. त्यावेळी एनसीबीनं त्यांना टीप मिळाल्यानंतर या दाम्पत्याच्या घरावर छापा टाकला, जेथे तपास यंत्रणेने 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला होता. या प्रकरणी कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती आणि होस्ट हर्ष यांचीही अनेक तास चौकशी करण्यात आली. जिथे दाम्पत्याने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती.
Mumbai NCB files a 200-page chargesheet against comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiya before the court. They were arrested in 2020 in connection with a drugs case, they are currently out on bail: NCB (Narcotics Control Bureau)
— ANI (@ANI) October 29, 2022
आता एनसीबीनं या प्रकरणी 200 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. एजन्सीच्या तपासात कोणते तथ्य समोर आले आहे, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण पुन्हा एकदा भारती सिंह आणि हर्ष यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होत आहे. त्यामुळे या दोघांवर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार लटकू शकते. (Drugs Case Ncb Files A 200 Page Chargesheet Against Comedian Bharti Singh And Harsh Limbachiya)
2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडपासून ते टीव्ही स्टार्सपर्यंत सगळ्यांची तपासणी केली. या प्रकरणी रिया चक्रवर्तीसारख्या स्टार्सना ताब्यात घेण्यात आले होते, तर दीपिका पदुकोण ते सारा अली खानसह अनेक स्टार्सचीही चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे.