डॉ हाथी घ्यायचे एवढे मानधन

एका शो करता इतके रुपये आकारायचे

डॉ हाथी घ्यायचे एवढे मानधन  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत डॉ हाथी यांच पात्र साकारणारे कवि कुमार आझाद यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. असं असलं तरी चाहते अजूनही डॉ हाथी यांना विसरलेले नाहीत. डॉ हाथी हे लोकप्रिय कवि होते आणि गेल्या कित्येक वर्षांपासून आझाद या मालिकेशी जोडलेले आहेत. शोची संपूर्ण स्टारकास्ट या डॉ हाथी यांच्या अचानक जाण्याने दुःखी झाली आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे की आझाद यांच्यानंतर डॉ हाथी यांच कॅरेक्टर कोण प्ले करणार आहे? 

आताच अशी माहिती मिळाली आहे की, शोमध्ये नव्या डॉ हाथी यांची एन्ट्री होणार आहे. शोचे प्रोड्यूसर असित मोदीने काही दिवसांपूर्वी सांगितलं की, डॉ हाथी हा अजूनही शोचा भाग आहे. त्या पात्राकरता नवीन कलाकाराची शोध सुरू आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, या शोमधूनच आझाद यांच घर चालत होतं. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे घरच्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 'तारक मेहता' या शोने डॉ हाथी यांनी जेवढी लोकप्रियता मिळवून दिली तेवढेच पैसे देखील मिळवून दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आझाद एका दिवसाकरता शुटिंगचे 25 हजार रुपये आकारत असे. प्रत्येक दिवसानुसार कॉन्ट्रक्टनुसार हाथी एका महिन्यात जवळपास 7 लाख रुपये कमवत असे. 

2010 मध्ये आझाद यांनी आपलं 80 किलो वजन कमी केलं होतं. त्या अगोदर कवि जवळपास 200 किलोचे होते. या सर्जरीनंतर वजन कमी झाल्यामुळे रोजच्या आयुष्यात वावरणं अधिक सोपं झालं होतं. यानंतरही आझाद यांना आणखी वजन कमी करण्यासाठी सांगितल होतं. पण आझाद यापुढे आणखी वजन कमी करण्यास तयार नव्हते. कारण त्यांना असं वाटत होतं की, मी वजन कमी केल्यावर मला मिळणार काम जाईल. जास्त वजनामुळेच मला डॉ हाथी यांच काम मिळत होतं.