महिलांवर होणाऱ्या हिंसाचारावर 'डॉक्टर डॉन' म्हणतोय...

स्त्रियांनी या 'गप्प बसा संस्कृती'चा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे.  

Updated: May 27, 2020, 01:05 PM IST
महिलांवर होणाऱ्या हिंसाचारावर 'डॉक्टर डॉन' म्हणतोय... title=

मुंबई : जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढत आहे. त्याप्रमाणे लॉकडाऊन मधील घरगुती हिंसेतही वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका महिलांना बसत आहे. लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची धक्कादायक माहिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे . त्यामुळे अभिनेता देवदत्त नागेने एका वेगळ्या अंदाजात कविता सादर करत या आणीबाणीच्या काळात संयम ठेवून आनंदाने आणि जाबाबदारीने वागण्याचे आवाहन सर्व जोडप्यांना केले आहे. झी युवा वाहिनीवरील डॉक्टर डॉनची ही कविता सध्या तुफान व्हायरल होत आहे.  

या काळात सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसत आहे. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक, मानसिक त्रास आणि वेदना गप्प बसून सहन कराव्या लागतात. स्त्रियांनी या 'गप्प बसा संस्कृती'चा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे. याला छेद देऊन आज पुढे येण्याची गरज आहे . 

मारहाण हे स्त्रियांवरील हिंसेचं उघड रूप आहे, पण फक्त मारहाण म्हणजे हिंसा नाही. मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक हीन वागणूक, लैंगिक छळ, जबरदस्तीने शारीरिक संबंध, छेडछाड ही देखील हिंसाच आहे. त्यामुळे देवा ने अगदीच हलक्या फुलक्या अंदाजात  ही कविता सादर केली आहे, 

जर तुम्हाला डॉक्टर डॉनची ही कविता आवडली तर त्याला त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.