दीपिकाच्या चाहत्यांच्या प्रेमाची कमाल ; #DP1stDay1stShow हॅशटॅग होतोय ट्रेंड....

संजय लीला भन्साळींच्या पद्मावत चित्रपटाला देशभरातून विरोध झाला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 25, 2018, 07:40 PM IST
दीपिकाच्या चाहत्यांच्या प्रेमाची कमाल ; #DP1stDay1stShow हॅशटॅग होतोय ट्रेंड.... title=

नवी दिल्ली : संजय लीला भन्साळींच्या पद्मावत चित्रपटाला देशभरातून विरोध झाला. अनेक वादांतून जात आज अखेर चित्रपट प्रदर्शित झाला.

दीपिकाच्या चाहत्यांचे अनोखे प्रेम

मात्र दीपिकाच्या फॅन्सने एक अनोखे कॅपेन सुरू केले. चित्रपटाला विरोध होत असताना दीपिकाच्या फॅन्सने पद्मावत चित्रपटाच्या तिकीटासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. इतकंच नाही तर ट्विटरवर #DP1stDay1stShow हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेंडमध्ये आहेत. 

दीपिकाने ट्वीट करुन व्यक्त केला आनंद

चाहत्यांच्या या प्रेमाने दीपिकाही काहीशी भावूक झाली. तिने ट्वीट करुन तिचा आनंद व्यक्त केला.

आपल्या चाहत्यांचा उत्साह पाहुन दीपिकाने ट्वीट केले की, ''मी जे सगळे बघत आहे यावर माझा विश्वास बसत नाही आहे. खऱ्या प्रेमाची ही पावती आहे. या सगळ्यामुळे मी फक्त भारावून गेले नाही तर तुमचे हे अनोखे प्रयत्न पाहुन अत्यंत विनम्र वाटत आहे. तुम्हाला सर्वांना खूप सारे प्रेम.''

हॅशटॅग ट्रेंड

सोशल मीडियावर #DP1stDay1stShow हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्याचबरोबर दीपिकाच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघण्याचे सुचवले आहे. अशाप्रकारचे फोटोज शेअर करणारे चाहते सर्वच वयोगटातील आहेत. 

संजय लीला भन्साळींसोबत चित्रपटाची हॅट्रिक

पद्मावत चित्रपटानंतर दीपिकाने निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत चित्रपटाची हॅट्रिक पूर्ण केली. लीला, मस्तानी आणि पद्मिनी अशा महत्त्वपूर्ण आणि आठवणीत राहणाऱ्या भूमिका तिला मिळाल्या. दीपिकाच्या राणी पद्मिनीच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले.

सुरुवातीपासून पद्मावतला राजपूत करणी सेनेचा जबरदस्त विरोध होता. सुरूवातीला राजस्थानात असलेला हा विरोध नंतर देशभर पसरला. गुजरात, राजस्‍थान, मध्‍यप्रदेश आणि हरियाणात चित्रपटावर बंदी घालण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आज चित्रपट प्रदर्शित झाला.