'या' चित्रपटाने केलेय छप्पर फाड कमाई! कमाईचा आकडा ऐकून डोळे गरगरतील

तुम्हाला माहितेय का? जगातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट कोणता?   

Updated: Dec 26, 2022, 06:53 PM IST
'या' चित्रपटाने केलेय छप्पर फाड कमाई! कमाईचा आकडा ऐकून डोळे गरगरतील title=
do you know Which is the highest grossing movie in the world Marathi Entertainment News nz

Highest Grossing Movie in the World : सिनेमाच्या जगात चित्रपट किती बजेटचा आहे आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे याचा विचार सर्वप्रथम केला जातो. चित्रपट सृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट रिलीज होतात. त्यातले काही चित्रपट सुपरहिट, ब्लॉकबस्टर ठरतात तर काही फ्लॉप ठरतात. चित्रपट सुपरहिट आणि फॉलाप होण्यामागे सगळ्यात मोठा हात असतो तो त्यात काम करणाऱ्या व्यक्तींचा.  Chapter 2' चे बजेट 100 कोटी रुपये होते आणि जगभरात 1200 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्याचप्रमाणे ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' हा सिनेमा जवळपास 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला असून जगभरातून 411 कोटी रुपये कमावले आहेत. 

तुम्हाला माहितेय का? जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता आहे? 2007 साली एक हॉलिवूड चित्रपट 'पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी' प्रदर्शित झाला, हा विक्रम आजही या चित्रपटाच्या नावावर आहे. सुमारे $60,000 च्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे जगभरात $400,000 कलेक्शन होते. म्हणजे चित्रपटात गुंतवलेल्या पैशापेक्षा 19,758 टक्के अधिक कमाई या चित्रपटाने केली होती.

पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी या चित्रपटाची कथा

पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीया चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती ओरेन पेली यांनी केली. इतकंच नव्हे तर या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि एडिटींग देखील त्यांनीच केली आहे. हा चित्रपट भयकथेवर आधारित आहे. हा चित्रपट केटी फेदरस्टन आणि मीका स्लोट या तरुण जोडप्याच्या जीवनावर आधारित आहे. हे जोडपं एका घरात राहतं त्यांना त्या घरात काही विचित्र अनुभव येऊ लागतात आणि म्हणून ते जोडपं सीसीटीव्ही च्या माध्यामातून सगळं काही रेकॉर्ड करायचं ठरवतात.  हा चित्रपट सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करुन तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाला अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2009 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आणि त्याने प्रचंड कमाई केली. 

 

Paranormal Activity मालिकेतील चित्रपटांची यादी

पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी याच्या पाहिल्या भागाला आलेलं यश पाहून दिग्दर्शकाने याची मालिका तयार करण्याचे ठरवले. 'पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी 2' चित्रपट मालिकेतील दुसरा चित्रपट, 2010 साली प्रदर्शित झाला. पहिल्या दोन चित्रपटांचे बंपर यश पाहून 2011 मध्ये प्रीक्वल 'पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी 3' रिलीज झाला. 'पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी 4' चा सिक्वेल 2012 मध्ये रिलीज झाला होता. त्याचा पाचवा हप्ता आणि स्पिन-ऑफ The Marked Ones 2014 मध्ये रिलीज झाला. यानंतर 2015 मध्ये 'द घोस्ट डायमेंशन' हा सहावा चित्रपट प्रदर्शित झाला. तर 'नेक्स्ट ऑफ किन' या मालिकेतील सातवा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. निर्माते 2023 मध्ये मालिकेतील 8 वा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत.