TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील या दोन पात्रांमध्ये आहे रक्ताचं नातं, ऐकून म्हणाल, 'हे माँ माताजी'

'तारक मेहता का उल्टा चष्मा'  हा शो गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत आहे.

Updated: Dec 30, 2021, 08:10 PM IST
TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील या दोन पात्रांमध्ये आहे रक्ताचं नातं, ऐकून म्हणाल, 'हे माँ माताजी' title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  हा शो गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत आहे. हा शो केवळ लोकांना आवडत नाही तर टीआरपीमध्येही कायम अव्वल असतो. छत्र्यांवर  प्रेम करणारा  पोपटलाल असो, किंवा मग अतरंगी दया भाभी, डाइट फूडमुळे मेहता साहेब असो किंवा मग  खाण्याच्या प्रेमात असणारे डॉ. हाथी.  असोत. प्रत्येक पात्र  प्रेक्षकांच्या खूप जवळचं आहे. आज आम्ही या शोच्या कलाकारांबद्दल किंवा पात्रांबद्दल बोलणार नाही, तर या शोशी संबंधित दोन व्यक्तींबद्दल बोलणार आहोत ज्यांचं एकमेकांशी रक्ताचं नातं आहे. 

शोमधील दयाबेनचं पात्र सर्वांनाच आवडतं आणि जेव्हा तिचा वीरा म्हणजेच सुंदरलाल अहमदाबादहून तिला भेटायला येतो तेव्हा मग काय? या कमाल भावंडांसमोर प्रत्येकजण फेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, रिल लाईफ भावंडांची भूमिका साकारणारे सुंदरलाल आणि दयाबेन हे खऱ्या आयुष्यातही भावंड आहेत. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी आणि सुंदरलाल म्हणजेच मयूर वाकानी हे खऱ्या आयुष्यात भावंडे आहेत. आणि ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.

शोमध्ये, जिथे दयाबेन सुंदरलालला प्रेमाने वीरा म्हणते, तर सुंदरलाल दयाबेनला बहना म्हणून हाक मारतो. आणि जेव्हा हे दोघं पडद्यावर एकत्र येतात. तेव्हा दोघंही कमाल करतात. खरं तर दिशा वाकानी आणि मयूर वाकानी अशा कुटुंबातून आले आहेत जिथे अभिनय त्यांच्या रक्तात आहे. त्यांचे वडील देखील एक अभिनेते आहेत आणि तारक मेहताच्या एपिसोडमध्ये दिसले देखील  होते. गुजराती चित्रपटसृष्टीतील ते एक प्रसिद्ध नाव आहे. सध्या तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेन आणि सुंदरलाल दोघंही दिसत नसले तरी दोघांची लोकप्रियता आजही आपल्याला पाहयला मिळते.