दिशा पटानीची स्टाईल तुम्हाला पाडेल प्रेमात; घायाळ करणारा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

Updated: Jun 2, 2022, 05:19 PM IST
दिशा पटानीची स्टाईल तुम्हाला पाडेल प्रेमात; घायाळ करणारा व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दिशाचे नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे ज्यांनी फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केलं आहे. दिशा पटानीचा अभिनय, नृत्य आणि तिचा फिटनेस लोकांना नेहमीच आवडतो. दिशा पटानीच्या इंस्टाग्रामच्या चाहत्यांची यादी बरीच मोठी आहे. तर अभिनेत्री स्वतः वेळोवेळी चाहत्यांमध्ये क्रेझ राखण्याची एकही संधी सोडत नाही.

दिशा भलेही चित्रपटांमध्ये कमी दिसत असेल पण ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. दिशा पटानी तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. दरम्यान, अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा पटानीची अतिशय किलर स्टाईल पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा लाल रंगाचा ड्रेस परिधान करून अतिशय ग्लॅमरस लूक देताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओमध्ये दिशा पटनीची स्टाइल पाहून तुम्ही पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यावर फिदा व्हाल. या व्हिडिओमध्ये दिशा बोल्ड एक्सप्रेशन देत आहे. दिशा पटनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अल्पावधीतच या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर, चाहते तिच्या या व्हिडिओवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून खळबळ माजवते.