Nagraj Manjule Wife and Son: दहा वर्षांपुर्वी आलेल्या फॅन्ड्री (Fandry) या चित्रपटानं आपल्या सगळ्यांनाच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या अनेक चित्रपटांनी आपल्यालाही त्यांच्या दिग्दर्शनाच्या प्रेमात पडण्यास भाग पाडले. त्यांचा नुकताच आलेला बीग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतच झुंड (Zhund) हा आगळावेगळा चित्रपटही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्यांच्या वेगळ्या दिग्दर्शन-लेखन शेैलीचे यावेळी प्रचंड कौतुक करण्यात आले. सध्या त्यांचा 'घर बंदूक बर्यानी' (Nagraj Manjule Upcoming Film) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या या हटके चित्रपटाचे प्रमोशन सध्या सुरू आहे. आपल्या नानाविध चित्रपटांनी जगाला वेगळे विषय देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे नागराज मंजुळे आपल्या सर्वात गाजलेल्या 'सैराट' (Sairat) या चित्रपटासाठी ओळखले जातात. त्यांची ख्याती ही आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. (director Nagraj Manjules wife and son photo goes viral from an event entertainment news in marathi)
सध्या नागराज मंजुळे हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सगळ्याचेच लक्ष वेधून घेतो आहे. यामध्ये नागराज मंजुळे आपल्या पत्नीची आणि मुलाची ओळख करून देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते एका लॉन्च सोहळ्यात असल्याचे दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चाचा विषय ठरला आहे. या व्हिडीओ ते आपल्या पत्नीचा उल्लेख करताना दिसत आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव गार्गी कुलकर्णी असल्याचे समजते आहे. या सोहळ्यात ते सहकुटुंब सहपरिवार आलो असल्याचा उल्लेख करतात.
सर्वप्रथम ते माईकवर बोलत प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. त्यानंतर ते आपल्या पत्नीला बोलवतात आणि त्यांचे कौतुक करतात त्यानंतर ते आपल्या मुलालाही बोलवतात. सर्वप्रथम ते आपल्या पत्नीचा गार्गीचा उल्लेख करतात आणि मग आपल्या मुलाची ओळख करून देतात. त्यांच्या पत्नीही निर्माती असल्याचे कळते आहे.
नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्यानी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात अभिनेते सयाजी शिंदे आणि अभिनेता आकाश ठोसरही आहे. त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे सध्या ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना दिसत आहेत. नागराज मंजुळे यांच्या नवीनतम चित्रपटांची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते.
मराठीच नाही तर जागतिक प्रेक्षक हे त्यांच्या चित्रपटांचे फॅन आहेत. सैराट या चित्रपटानं तर 100 कोटींचा गल्ला भरला होता. त्यांच्या झुंड या चित्रपटानंही चांगली कमाई केली होती. त्यांना अनेक आतंरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मोठमोठ्या फिल्म फेस्टिवलमध्येही त्यांनी नाव कमावले आहे.