Dipika Baby Bump : लपवूनही दिसला दीपिकाचा बेबी बंप ! लवकरच देणार गुडन्यूज

दीपिका सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. 

Updated: Dec 25, 2022, 09:56 PM IST
 Dipika Baby Bump : लपवूनही दिसला दीपिकाचा बेबी बंप ! लवकरच देणार गुडन्यूज title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कड (Dipika Kakar) ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. दीपिका अभिनेता आणि सहकलाकार शोएबनं (Shoaib Ibrahim) त्यांच्या चाहत्यांना एक मोठी बातमी दिली आहे. दीपिका लवकरच आई होणार असल्याची बातमी ऐकायला मिळत आहे. लग्नाच्या 4 वर्षांनतर दीपिका आणि शोएब आई-वडील होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.  

दीपिका कक्कर सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दीपिकाने नुकताच तिची वहिनी सबाचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान, व्हिडिओमध्ये तिचा बेबी बंप दिसतोय. यानंतर, सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

वहिनीच्या वाढदिवसानिमित्त लिहिलं खास कॅप्शन 
दीपिका कक्करने २०१८ मध्ये शोएब इब्राहिमसोबत लग्न केलं. दीपिकाचं शोएबसोबतचं हे दुसरं लग्न होतं. लग्नाच्या चार वर्षांनी दीपिकाच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी रात्री दीपिकाने शोएबची बहीण सब इब्राहिमचा वाढदिवस साजरा केला. दीपिकाने मेव्हणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या फोटोमध्ये दीपिका तिच्या वहिनी आणि पतीसोबत दिसत आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हॅपी बर्थडे... हा वाला बर्थडे खूप खास आहे कारण आता तू तुझ्या प्रिय व्यक्तिची बायको झाली आहेस. तुझं जीवन असंच सदैव आनंदाने भरलेलं जावो... तु अशीच सदैव हसत राहा.

केवळ दीपिकाच नाही तर शोएब इब्राहिमनेही बहीण सबाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शोएब आपल्या बहिणीच्या वाढदिवसाला इतका आनंदी दिसत होता. मात्र  सगळ्यात सर्वांच्या नजरा फक्त दीपिकावर खिळल्या होत्या. व्हिडिओमध्ये चाहत्यांना दीपिकाचा बेबी बंप दिसत आहे. तिचा हा बेबीबंप फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दीपिका आणि शोएब हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 'ससुराल सिमर का 2' या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली. 22 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांच लग्न झालं होतं. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दीपिका आणि शोएबने लग्न केले. करिअरविषयी बोलायचं झालं तर दीपिका सगळ्यात शेवटी 'ससुराल सिमर का 2' या मालिकेत छोट्या भूमिकेत दिसली. त्यानंतर दीपिका ही सध्या टीव्ही शोपासून दूर आहे.