असीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात?

 युथफूल कन्टेन्टने प्रेक्षकांना मनाने चिरतरुण ठेवणाऱ्या झी युवा या वाहिनीने प्रत्येक मालिकेतून वेगवेगळे विषय देऊन प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजित केले आहे. एक यशस्वी डॉक्टर बनून मोबाईल हॉस्पिटल चालू करण्याचे स्वप्नपाहणारी डॉ. अंजली प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. तिचा महत्वाकांक्षीपणा आणि प्रत्येक परिस्थितीला निडरपणे सामना करण्याची वृत्ती प्रेक्षकांना भावली आणि अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले.

Updated: Apr 23, 2018, 02:28 PM IST
असीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात? title=

मुंबई : युथफूल कन्टेन्टने प्रेक्षकांना मनाने चिरतरुण ठेवणाऱ्या झी युवा या वाहिनीने प्रत्येक मालिकेतून वेगवेगळे विषय देऊन प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजित केले आहे. एक यशस्वी डॉक्टर बनून मोबाईल हॉस्पिटल चालू करण्याचे स्वप्नपाहणारी डॉ. अंजली प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. तिचा महत्वाकांक्षीपणा आणि प्रत्येक परिस्थितीला निडरपणे सामना करण्याची वृत्ती प्रेक्षकांना भावली आणि अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले.

सध्यामालिकेमध्ये एक अनोखा ट्विस्ट प्रेक्षक पाहत आहेत. डॉ. असीम आणि डॉ. अंजलीचा साखरपुडा झाला आणि डॉ. यशने त्या दोघांना एक मोबाईल हॉस्पिटल भेट केले. त्यानंतर डॉ. असीम बेपत्ता होतो आणि त्याचा आरोप मात्र डॉ. यशवर येतो.  डॉ. यशचे अंजलीवर असलेले एकतर्फीप्रेम लक्षात घेता पोलिसांनादेखील डॉ. यशवर संशय येतो आणि त्यामुळे असिमच्या बेपत्ता होण्यामागे त्याचा हात असावा अशी शंका घेतली जात आहे. यश अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करतो की यात त्याचा काही हात नाही पणकोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. यशच्या प्रेमात पडलेली रोहिणी मात्र एकच व्यक्ती आहे जी त्याच्या बाजूने उभी राहते. यश त्याचं प्रेम मिळवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही असा विश्वास देखील रोहिणीडॉ. यशवर दाखवते.

रोहिणीने यशवर दाखवलेल्या विश्वासाने त्यांच् नातं अजून दृढ होईल का? अंजली यशवर विश्वास ठेवेल का? हे पाहण्यासाठी, पहायला विसरु नका अंजली सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त झी युवा वर