करण कुंद्रा करण जोहरच्या जागी? गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशसोबत शोमध्ये एंट्री!

करण जोहरने अनेक वर्षांपूर्वी टीव्हीवर पदार्पण केलं आहे.

Updated: Jun 3, 2022, 06:24 PM IST
करण कुंद्रा करण जोहरच्या जागी? गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशसोबत शोमध्ये एंट्री! title=

मुंबई : करण जोहरने अनेक वर्षांपूर्वी टीव्हीवर पदार्पण केलं आहे. त्याचा कॉफी विथ करण हा शो खूप गाजला. पण गेल्या वर्षी करण जोहर बिग बॉस ओटीटीमध्ये सामील झाला आणि त्याआधी सीजन होस्ट केला. त्याचबरोबर, अशी बातमी आहे की करण कुंद्राच्या जागी करण जोहर आला आहे आणि तो त्याचा दुसरा सीझन गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशसोबत होस्ट करणार आहे.

ऑफिशिअल घोषणेची वाट पाहत आहे
मीडिया रिपोर्ट्समध्ये या बातम्या सांगण्यात येत असल्या तरी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कंगना राणौतच्या लॉक अप शोमध्ये करण कुंद्राच्या आगमनाचा खूप फायदा झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. लॉकअपच्या काही खास भागांनंतर, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एका प्रोजेक्टसाठी हात जोडण्याची ही पहिलीच वेळ असेल.

बिग बॉसमध्ये बनली दोघांची जोडी 
बिग बॉस 15 सीझनची खूप चर्चा झाली आणि यावेळी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसले. सुरुवातीच्या काही आठवड्यांनंतर दोघंही एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि मग बघता बघता त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. बिग बॉसचं घर सोडल्यानंतरही त्यांचे प्रेम कायम राहिलं आणि सध्या ते दोघंही टीव्हीचं पॉवर कपल आहेत. जे सोशल मीडियावर प्रभुत्व मिळवतात आणि पापाराझींचेही आवडते आहेत.

करण जोहरबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'कॉफी विथ करण 7' मध्ये दिसणार आहे. सध्या त्याचं शूटिंग सुरू असून लवकरच त्याचं प्रसारणही होणार आहे. याचबरोबर करणच्या शोमध्ये कोणते सेलेब्स पोहोचतील हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांनाही खूप उत्सुकता आहे.