मुंबई : 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता राजची चर्चा तिच्या चित्रपटांमुळे कमी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती. अनिता प्रसिद्ध अभिनेते जगदीश राज यांची मुलगी आहे. जगदीश राज हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध स्टार आहेत आणि चित्रपटांमध्ये सर्वाधिक 200 वेळा पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारल्याबद्दल त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट आहे.
अनितानेही वडिलांना पाहून चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनीही तिला त्यांच्या एका चित्रपटात कास्ट करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, तो चित्रपट होऊ शकला नाही. यानंतर तिने चित्रपट निर्माता हृषिकेश मुखर्जी यांच्या 'अच्छा बडा' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये अनिता राज यांनी बहुतेक चित्रपट अभिनेता धर्मेंद्रसोबत केले.
मात्र तरीही त्यांच्या कारकिर्दीला हवी तशी वाढ मिळाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडस्ट्रीमध्ये धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्या जवळीकतेच्या चर्चा सामान्य झाल्या होत्या. मात्र, हेमा मालिनी यांना समजताच धरम पाजी यांनी अनितापासून दूर राहण्यास सुरुवात केली. मात्र, चित्रपटांमधील अपयशानंतर अनिता राज यांनी 1986 मध्ये चित्रपट निर्माता सुनील हिंगोरानी यांच्याशी लग्न केलं.
लग्नानंतर अनिता राज यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. ज्याचं नाव शिवम आहे. मात्र, बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असलेली अनिता 'एक थी रानी' आणि 'छोटी सरदारनी' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.