जबरा फॅनसोबत रिटायरमेंट एन्जॉय करतायेत धर्मेंद्र! फोटो पाहताच सनी, बॉबीनं दिल्या अशा प्रतिक्रिया...

Dharmendra : धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जबरा फॅनसोबत सुट्टीचा आनंद घेत असल्याचं सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 25, 2024, 06:26 PM IST
जबरा फॅनसोबत रिटायरमेंट एन्जॉय करतायेत धर्मेंद्र! फोटो पाहताच सनी, बॉबीनं दिल्या अशा प्रतिक्रिया... title=
(Photo Credit : Social Media)

Dharmendra : दिग्गज बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची यादी आजही कमी झालेली नाही. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचं कारण म्हणजे धर्मेंद्र यांनी ही पोस्ट शेअर करत सांगितलं की ते त्यांच्या एका जबरा चाहत्यासोबत सुट्टीचा आनंद घेत आहेत.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी एका व्यक्तीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ज्या व्यक्तीसोबत ते आहेत तो त्यांचा जबरा चाहता आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की 'मित्रांनो, 23 वर्षांपूर्वी अरुण सोफता नावाच्या या जबरा चाहत्याला भेटलो होतो, प्रेम वाढत गेलं आणि आज आम्ही एक कुटुंब झालो आहोत. अरुण एक चांगले आणि आनंदी राहणारे व्यक्ती आहेत. मी त्याच्यासोबत माझ्या सुट्टीचा आनंद घेत आहे.' त्यांनी शेअर केलेल्या या फोटोला 32 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. मात्र, सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे त्यांची मुलं बॉबी देओल आणि सनी देओलच्या कमेंटनं. त्या दोघांनी या पोस्टवर कमेंट करत रेड हार्ट शेअर केले आहेत. धर्मेंद्र हे त्यांच्या एका चाहत्यासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. हे पाहून सगळ्यांना आश्चर्य आणि त्यासोबत आनंद देखील झाला आहे. त्याचं कारण म्हणजे आजवर कोणताही सेलिब्रिटी हा त्यांच्या चाहत्यासोबत सुट्टीवर गेला नाही. त्यामुळे नेटकरी या पोस्टवर कमेंट करत त्यांचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा : 'विवाहबाह्य संबंध...', ऐश्वर्या अभिषेकला लग्न टिकवण्यासाठी काजोलने कोणता सल्ला दिला?

धर्मेंद्र यांनी 1960 च्या दशकात 'आई मिलन की बेला', 'फूल और पत्थर', 'आए दिन बहार के', 'आंखें', 'शिकार', 'आया सावन झूम के' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी आजवर बॉलिवूडला अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. धर्मेंद्र यांच्या आताच्या चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर ते रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसले होते. त्या चित्रपटातील त्यांच्या आणि शबाना आझमी यांच्यातील किसनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर धर्मेंद्र हे शाहिद कपूर आणि क्रिती सेननच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात देखील दिसले होते.