मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या एका बातमीने सगळ्यांनाच घाबरवून टाकलं होतं. बातमी होती की, अभिनेता सुनिल शेट्टीच्या बिल्डींगमध्ये कोरोना व्हायरसचे तीन डेल्टा व्हेरिएंट पेशन्ट आढळले आहेत. त्यामुळे सुनिल शेट्टीची बिल्डींग सील करण्यात आली आहे. ही बातमी वेगाने व्हायरल होताच सुनिल शेट्टीच्या चाहत्यांची ही चिंता वाढली.
पण ही बातमी फेक होती. स्वत: सुनिल शेट्टीने ही बातमी चूकीची आणि फेक असल्याचं ट्विट करत म्हटलं आहे. आणि खरी परिस्थिती काय आहे याचा देखील खुलासा केला आहे.
सुनिल शेट्टीने ट्विट करत म्हणतो, "वाह ! खोटी बातमी कोरोना व्हायरस पेक्षा ही वेगाने पसरली आहे.बिल्डींगमध्ये तीन पेशन्ट सापडल्याची बातमी खोटी आहे"
"आमच्या बिल्डींगमध्ये फक्त एक कोरोना पॉझिटीव्ह पेशन्ट आढळला आहे. जो ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहे. इतर सोसायटीतील लोकांना स्वत:ला आयसोलेटेड करुन घेतलं आहे. बिल्डींग बाहेर एकच नोटीस लावण्यात आलं आहे. पुर्ण बिल्डींग सील करण्यात आलेली नाही. मी आणि माझ्या फॅमिलीतील सदस्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत."
सोमवारी साऊथ मुंबईच्या अल्टामाउंट रोड येथे असलेल्या 'पृथ्वी अपार्टमेंट'ला सील करण्यात आलं आहे.येथे डेल्टा व्हेरिएंटचे तीन केस सापडले आहेत असी बातमी समोर आली होती.
याबाबत बीएमसीचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितलं, की बीएमसीने दक्षिण मुंबईच्या अल्टामाउंट रोड येथे असलेल्या 'पृथ्वी अपार्टमेंट'ला सील केलं आहे. कारण येथील काही लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. याच 'पृथ्वी अपार्टमेंट'मध्ये सुनिल शेट्टी त्याच्या फॅमिलीसोबत राहतो.पण सुनिल शेट्टीचा परिवार पुर्णपणे सुरक्षित आहे. आणि सगळ्यांनी स्वत:ला आयसोलेटेड केलं आहे.