सेलिब्रिटिंसह चाहत्यांनाही दीपिकाच्या नव्या लूकचं आकर्षण

दीपिकाच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे.  

Updated: Mar 25, 2019, 03:19 PM IST
सेलिब्रिटिंसह चाहत्यांनाही दीपिकाच्या नव्या लूकचं आकर्षण title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोनचा 'छपाक' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. तिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. तर दीपिकाने आगामी चित्रपट 'छपाक' चित्रपटाचे शुटिंग सुरू केले आहे. चित्रपटात ती अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. मेकअपच्या माध्यमातून हूबेहूब लक्ष्मी अग्रवालच्या चेहरेपट्टीतील अनेक बारकावे दीपिकाच्या चेहऱ्यावर साकारण्यात आले आहेत. दीपिकाच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे.  

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एका चाहत्याने तर तिला नॅशनल पुरस्कार मिळेल, असा दावा केला आहे. एका अॅसिड हल्ल्यातील पीडित मुलीची भूमिका साकारणे फार आव्हानात्मक असल्याचे तिच्या चाहत्याचे म्हणणे आहे.

 

 

 

दीपिकाच्या अशा लूकचे कौतुक फक्त चाहत्यांकडूनच झाले नाही, तर अनेक सिताऱ्यांनी सुद्धा तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. बॉलिवूडकर तिच्या अशा अनोख्या लूकने हैरानचं नाही, तर आकर्षित सुद्धा झाले आहेत. बॉलिवूडकरांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ असल्याचे कळत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी, म्हणजेच १० जानेवारी २०२० ला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.