दीपिका म्हणते, रणवीरशी नाही या व्यक्तीशी करणार लग्न

दीपिका पादुकोण सध्या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. पद्मावती हा सिनेमा अजून जरी वादात असला तरी दीपिकाने मात्र प्रमोशन सुरु केलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 22, 2017, 01:06 PM IST
दीपिका म्हणते, रणवीरशी नाही या व्यक्तीशी करणार लग्न title=

मुंबई : दीपिका पादुकोण सध्या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. पद्मावती हा सिनेमा अजून जरी वादात असला तरी दीपिकाने मात्र प्रमोशन सुरु केलं आहे.

दीपिका सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉसमध्ये आली होती. सलमानच्या समोर दीपिकाने असं काही म्हटलं की ज्यामुळे रणवीर सिंहला नक्कीच छोटासा झटका लागला असेल. 

सलमानने दिला होता टास्क

सलमानने दीपिकाला एक टास्क दिला होता. जर दीपिका समोर संजय लीला भंसाली, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर आहेत तर यामध्ये ती कोणाला डेट करेल, कोणाशी लग्न करेल आणि कोणाला मारेल असं विचारण्यात आलं होतं. या प्रश्नानंतर दीपिकाने जे उत्तर दिलं त्यानंतर चर्चा रंगू लागल्या.

Image result for deepika in bigg boss for padmavati zee

कोणाशी करणार लग्न ?

दीपिकाने रणवीरला डेट करेल, संजय लीला भंसालीसोबत लग्न करेल आणि शाहीदचं लग्न झालं आहे म्हणून त्याला डेट आणि लग्न न करता मारेल असं उत्तर दिलं. या प्रश्नाला स्मार्टपणे दीपिकाने उत्तर दिलं. यानंतर सलमान देखील तिच्यासाठी टाळी वाजवू लागला.