Deepika Padukone Trolled on Social Media: बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी दीपिकानं तिच्या एका नव्या ब्रँडविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या ब्रॅंडचं नाव सेल्फ-केअर ब्रँड, 82°E असे आहे. दीपिकाने 'अश्वगंधा बाउन्स' (Ashwagandha Bounce) मॉइश्चरायझर आणि 'पचौली ग्लो' (Patchouli Glow) सनस्क्रीन विषयी पोस्ट शेअर करत माहिती दिली. दीपिका भारतीय असली तरी ते ग्लोबल अपरोच ठेवते. त्यामुळे दीपिका यावेळी ट्रोल झाली आहे.
दीपिका तिचं ब्रेड लॉंचच्या वेळी म्हणाली की, 'माझी स्किनकेअर रूटिन हे माझ्या रोजच्या जीवनाती महत्त्वाची गोष्ट आहे. मी असेच प्रॉडक्स वापरते जे वापरनं सोपं आणि प्रभावी असतात. (skincare Routine) त्यामुळे मी माझ्या ब्रँडच्या पहिल्या दोन गोष्टी या SPF 40 सह अश्वगंधा बाउन्स आणि पॅचौली ग्लो सनस्क्रीन असे मॉइश्चरायझर, स्किनकेअर आणले आहेत.' (Deepika Padukone Daily Routine)
हेही वाचा : Rashmika Mandana ला डेव्हिड वॉर्नर का म्हणाला Sorry? पाहा Viral Video
पुढे दीपिका म्हणाली, 'आम्ही गेली दोन वर्षे प्रिमियम, हाई परफॉर्मेंस स्किनकेअर प्रोडक्ट्स तयार करण्यात घालवली आहेत जी पावरफुल साइंटिफिक कंपाउंडसोबत बऱ्याच टेस्ट केल्या आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स सेन्सेटिव्ह स्किन सोबतच सगळ्याच स्किनला सूट करतात.
दीपिकाच्या प्रोडक्ट्सच्या किंमतीवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'अश्वगंधा आणि सोडियम हायलुरोनेट असलेल्या या मॉइश्चरायझरची किंमत 2 हजार 700 रुपये आहे. तर पॅचौली आणि सिरॅमाइडसह बनवलेली सनस्क्रीन ड्रॉप्सची किंमत ही 1 हजार 800 रुपये आहे. एवढ्यात आम्ही एक महिन्याचा रेशन भरू शकतो. (Deepika Padukone Trolled For The Cost Of Her Skincare Brand 82 Netizens got angry)
अश्वगंधा बाउन्स मॉइश्चरायझर हे एक लाइटवेट मॉइश्चरायझर आहे, त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी, स्किन इलास्टिसिटीसाठी सगळ्यात चांगले असल्याचे म्हटले जात आहे. पॅचौली ग्लो सनस्क्रीन SPF 40 ब्रॉड स्पेक्ट्रम PA+++ हे पॅचौली लीफ एक्स्ट्रॅक्टला सिरॅमाइड्ससह एकत्र करते ज्यामुळे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होईल. हे प्रोडक्ट्स स्किनकेअरला सोप बनवण्यासाठी आहे. हे प्रोडक्ट्स वीगन, क्रूल्टी फ्री आहेत.