'ब्रूटल आणि वायलेंट ऑफिसर' दीपिकाचा सिंघम अवतार! फोटो तुफान व्हायरल

Deepika Padhukone In Rohit Shetty's Cop Universe : दीपिका पदुकोणची रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये एन्ट्री... सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा 

दिक्षा पाटील | Updated: Oct 15, 2023, 12:20 PM IST
'ब्रूटल आणि वायलेंट ऑफिसर' दीपिकाचा सिंघम अवतार! फोटो तुफान व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Deepika Padhukone In Rohit Shetty's Cop Universe : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप यूनिव्हर्समधील 'सिंघम अगेन' साठी प्रेक्षक आतुर आहेत. अजय देवगणच्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका असेल. तर काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टीनं खुलासा केला होता की या चित्रपटात दीपिका पदुकोण देखील लेडी सिंघमच्या भूमिकेत असेल. अशात आता सिंघम अगेनमधील दीपिकाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. रोहित शेट्टीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दीपिकाचा फर्स्ट लूक दाखवला आहे. 

रोहित शेट्टीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये दीपिकाचा पोलिसाच्या वर्दीतील स्वॅग पाहायला मिळत आहे. यासोबत तिच्या समोर एक गुन्हेगार असून त्याच्या तोंडात तिनं बंदूक धरली आहे. तर दुसऱ्या फोटोत दीपिका आणि तिची बंदूक पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीनं हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की स्त्री ही सीतेचे पण रूप आहे आणि दुर्गेचं देखील... आमच्या कॉप युनिव्हर्समधील सगळ्यात ब्रूटल आणि वायलेंट ऑफिसरला भेटा... तिचं नावं शक्ति शेट्टी. माझी लेडी सिंघम... दीपिका पदुकोण. रोहितनं शेअर केलेल्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तर त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रोहित शेट्टीनं शेअर केलेली ही पोस्ट पाहताच त्यावर रणवीर सिंगनं कमेंट करत म्हटले की ' रे देवा... आली रे आली।' फक्त रणवीर नाही तर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत म्हणाले की तिला पाहण्यासाठी उत्सुक आहोत. तर शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी कमेंट करत म्हणाली की 'सूपर हॉट.' पूजा हेगडे म्हणते 'शेट्टी पॉवर.' याशिवाय अनेक कलाकारांनी दीपिकाला पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'तू पण नवऱ्याच्या घाणेरड्या चित्रपटांमध्ये...', राज कुंद्रासारखा मास्क घातल्यानं शिल्पा शेट्टीवर खालच्या भाषेत नेटकऱ्यांची कमेंट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बॉलिवूड हंगामानं एक रिपोर्ट शेअर करत सांगितले होते की या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर ही खलनायकाच्या भूमिकेत असली अशी चर्चा सुरु आहे. तर हा चित्रपच 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिंघम अगेनमध्ये अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर हे दिसणार आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सची सुरुवात ही 'सिंघम' या चित्रपटातून झाली होती. त्यानंतर 'सिंघम रिटर्न्स', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' रिलीज आहेत.