श्वेताच्या इंटिमेट सीनवर मुलीची अशी प्रतिक्रिया

विवाहबाह्य संबंधांच्या पेचात अडकलेली श्वेता तिवारी  

Updated: Dec 9, 2019, 05:37 PM IST
श्वेताच्या इंटिमेट सीनवर मुलीची अशी प्रतिक्रिया  title=

मुंबई : 'कसौटी जिंगदी की' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी 'हम तुम और देम' वेबसीरिजमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमधील ती अभिनेता अक्षय ओबेरॉयसोबत इंटिमेट सीन करताना दिसत आहे. सध्या तिचा हा ट्रेलर चांगलाच व्हायरल होत आहे. 

नुकताच झालेल्या एका मुलाखीत तिला या इंटिमेट सीननंतर मुलगी पलकच्या प्रतिक्रिया कशा होत्या असा प्रश्न विचारण्यात आला. 'जेव्हा सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला मी फार घाबरले होते. मी जेव्हा क्रिएटीव्ह टीमला फोन केला आणि विचारलं हे काय आहे.' एकंदर तिला हा ट्रेलर आवडला नव्हता. 

त्यानंतर ट्रेलर आई, मित्र आणि कुटुंबियांना कसा दाखवणार हा एकच प्रश्न तिच्यासमोर उभा होता. श्वेता म्हणाली, 'त्यानंतर ट्रेलर मी पलकला पाठवला तेव्हा तिने वाओ मॉम... अशी प्रतिक्रिया दिली.' त्यानंतर तिने क्रिएटीव्ह टीमची माफी मागत ट्रेलर शेअर केला. 

सीरिजमधील श्वेता आणि अक्षयची केमेस्ट्री आणि बोल्ड सीन प्रेक्षकांना ६ डिसेंबर २०१९ रोजी अनुभवता येणार आहे. ALT Balaji आणि Zee5 वर ही वेबसीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे.