डान्स क्वीन सपना चौधरीवर लोकांनी फोडल्या किंकाळ्या, नेमकं काय घडलं?; Video व्हायरल

परंतु आता असाच एक डान्स व्हिडीओ करणं सपनाला महागात पडलं आहे. 

Updated: Sep 10, 2022, 02:05 PM IST
डान्स क्वीन सपना चौधरीवर लोकांनी फोडल्या किंकाळ्या, नेमकं काय घडलं?; Video व्हायरल  title=

Sapna Chaudhaury Dance Video: हरियाणाची डान्सिंग क्वीन सपना चौधरीला (Sapna Chaudhaury) आज कोण ओळखत नाही? सपना चौधरीला हरियाणाची शानही म्हटले जाते. नृत्यासोबत सपना ही एक उत्तम अभिनेत्री आहे. दररोज तिचे नवनवीन म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. परंतु आता असाच एक डान्स व्हिडीओ करणं सपनाला महागात पडलं आहे. (dancer sapna chaudhary falls down while performing a dance on stage video goes viral netizens makes fun of her)

सपनाने डान्स शो करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचे डान्स व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. आता तिचा असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये सपना स्टेजवर एका हरियाणवी गाण्यावर पूर्ण उर्जेने डान्स करताना दिसत आहे. पण नाचत असताना तिच्यासोबत असं काही घडतं की त्यावरून नेटकरी तिची खिल्ली उडवतात. डान्सदरम्यान सपना चौधरीचा तोल जातो आणि ती जोरात स्टेजवर पडते.

तिला पडताना पाहून तेथे उपस्थित असलेले तिचे चाहते जोरजोर किंचाळयला लागतात पण सपना लगेच उभी राहते आणि मग नाचायला लागते.

सपना चौधरीचा डान्स जलवा पाहून प्रत्येक लोकं बेभान होऊन जातात. तिनं लोकप्रिय रिअलिटी शो बिग बॉसमध्येही हजेरी लावली होती. त्यामुळे सपनाच्या चाहत्यांमध्ये सध्या तिची जोरदार हवा आहे.