डॅडीच्या B. R. A. गॅंगचा छुपा चेहरा

असीम अहलुवालिया दिग्दर्शित , अर्जुन रामपाल आणि ऋत्विज पटेल निर्मित सिनेमा डॅड्डी चित्रपटाची आजकाल सर्वत्र हवा चालली आहे .

Updated: Sep 8, 2017, 02:43 PM IST
डॅडीच्या B. R. A. गॅंगचा छुपा चेहरा title=

मुंबई : असीम अहलुवालिया दिग्दर्शित , अर्जुन रामपाल आणि ऋत्विज पटेल निर्मित सिनेमा डॅड्डी चित्रपटाची आजकाल सर्वत्र हवा चालली आहे .अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या जीवनावर आधारित डॅडी चित्रपट याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . अरुण गवळी यांची BRA गॅंग ही त्यांच्या काळात फार नावारूपाला आलेली होती , बाबू , रामा आणि अरुण अशा तिघांची मिळून ही गॅंग होती . पण ह्या गॅंग मध्ये अजून एक साथीदार होता , ज्याचं नाव आहे "विजय" 

मराठी सिनेअभिनेता पूर्णानंद जे अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे .तुकाराम ,फॅन्ड्री, आजचा दिवस माझा अश्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी आपला अभिनयकला मांडली आहे .  बॉलीवूड चित्रपट डॅड्डी ह्यामध्ये अरुण गवळी यांची भूमिका साकारणारे अर्जुन रामपाल यांसोबत पूर्णानंद अभिनय करताना दिसणार आहे . 

अरुण गवळी यांच्या जीवनावर आधारित डॅड्डी हा चित्रपट लवकरच  प्रदर्शित होणार आहे अंडरवल्ड शी संबंध ठेवणारे अरुण गवळी यांची टोळी B R A नावाची गॅंग होती . बाबू , रामा आणि अरुण अश्या तिघांची मिळून हि गॅंग होती . पण ह्या गॅंग मध्ये अजून एक साथीदार होता , ज्याचं नाव आहे "विजय ".  

बाबूच्या भूमिकेत आनंद इंगळे , रामा च्या भूमिकेत राजेश शृंगारपुरे तर अरुण च्या भूमिकेत अर्जुन रामपाल अभिनय करताना दिसणार आहेत . ह्या गॅंग मध्ये तिघांच्या सोबत अजून एक व्यक्ती असतो जो ह्या गॅंग चा "छुपा चेहरा" असतो ज्याचं नाव विजय असं आहे .देशभरात प्रदर्शित होणाऱ्या डॅड्डी चित्रपटातून लोकांच्या प्रसंशा मिळवण्यासाठी पूर्णानंद खूप उत्सुक आहेत .