जाऊ दे न व... हे गाणं या बाल गायकाने कसं गायलंय पाहा....

 हे गाणं रेकॉर्ड करताना लहान मुलांसोबत, रेकॉर्डिंग स्टुडिओतलं वातावरण किती उत्साहपूर्ण होतं, हे देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. 

Updated: Nov 6, 2018, 02:19 PM IST
जाऊ दे न व... हे गाणं या बाल गायकाने कसं गायलंय पाहा.... title=

मुंबई : नागराज मंजुळेची प्रमुख भूमिका असलेल्या 'नाळ' या सिनेमाचं गाणं, 'जाऊ दे न व...' चित्रपट प्रदर्शनाआधी चांगलंच गाजतंय. हे गाणं कोणत्या बालकलाकाराने गायलंय याच्याविषयी जेवढी उत्सुकता आहे, तेवढीच या गाण्याला संगीत कुणी दिलंय आणि हे गाणं कुणी लिहिलंय याची देखील आहे. 'जाऊ दे न व...' हे संपूर्ण गाणं देखील या व्हिडीओत आहे. 

'जाऊ दे न व...' हे गाणं बाल गायक जयेश कुमारने गायलंय, आणि हे गाणं रेकॉर्ड करताना लहान मुलांसोबत, रेकॉर्डिंग स्टुडिओतलं वातावरण किती उत्साहपूर्ण होतं, हे देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. तर या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे, ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी आणि गाणं देखील त्यांनीच लिहिलं आहे. तर ऐका संपूर्ण गाणं 'जाऊ दे न व...'