कॉमेडी किंग भाऊ कदमला 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर गंभीर दुखापत?

 झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला अभिनेता भाऊ कदम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Updated: Nov 16, 2023, 03:23 PM IST
कॉमेडी किंग भाऊ कदमला 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर गंभीर दुखापत?   title=

मुंबई : झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला अभिनेता भाऊ कदम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. याआधी भाऊ फू बाई फूमध्ये झळकला होता मात्र अभिनेत्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे चला हवा येऊ द्या या शोमधूनच. सोशल मीडियावर भाऊचा  खूप मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपुर्वीच भाऊच्या युट्यूब चॅनसाठी सिल्व्हर बटनही मिळालं आहे. सोशल मीडियावर भाऊ कायम सक्रिय असतो. भाऊच्या चाहत्यांसाठी मात्र एक चिंताजनक बातमी आहे. 

खरंतर भाऊचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडीओ दिग्दर्शक अभिनेता डॉ. निलेश  साबळेने त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भाऊच्या डोक्यला गंभीर दुखापत झाल्याचंही दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर भाऊचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये निलेश साबळेने लिहीलं आहे की, ''कॉमेडीच्या युद्धात जखमी झालेला योद्धा… त्याची मलम पट्टी करायला डॉक्टर लागतोच…''तर व्हिडीओमध्येही कॉमेडीच्या युद्धात जखमी झालेला योद्धा असं कॅप्शन दिलं आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते मात्र चिंतेत दिसत आहेत. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाहीये.

कारण व्हायरल होणारा हा व्हिडीओ हा फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात आलेला आहे. कारण निलेश साबळे यांनी व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनवरुन हे स्पष्ट होत आहे की, हा व्हिडीओ जवानच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ केवळ आणि केवळ मनोरंजनासाठी बनवला गेला आहे. या व्हिडीओच्या शेवटी जवानच्या लूकमध्ये दिसत आहे. मात्र तरिही त्याचे चाहते हा व्हिडीओ खरंच दुखापतीचा असल्याचा चाहत्यांचं म्हणणं होतं. मात्र हा व्हिडीओ केवळ आणि केवळ मनोरंजनाचाच आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहीलं आहे की, भाऊ झाला जवान मधला शाहरुख खान भाऊ वर्जन बघायला मज्जा येईल. तर अजून एकाने लिहीलंय, सगळं तुम्ही दादा करताय या कलाकृती ला सलाम म्हणून मोठ्या मनाने आम्ही हा कार्यक्रम एन्जॉय करत असतो निलेश दादा खरंच अप्रतिम.  तर अनेकांनी या व्हिडीओवर अनेकांनी स्माईल ईमोजी पाठवले आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.