नवी दिल्ली : आपल्या पत्नीचे कॉल्स रेकॉर्ड तपासल्याप्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनंतर आता अभिनेता टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ आणि कंगना रानौतचे नाव समोर आले आहे.
पोलीस कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) च्या नवनवे खुलासे करत आहे. आणि याचा बॉलिवूडशी मोठे कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.
ठाणे क्राईम ब्रॉचचे डेप्युटी कमिश्नर ऑप पोलीस अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले की, जॅकी श्रॉफची आई आयशा श्रॉफने अभिनेता साहिल खानचे सीडीआर बेकायदेशीररीत्या काढले आहेत आणि ते आरोपी वकील रिजवान सिद्दीकीकडे पाठवले आहेत.
रिपोर्टनुसार, रिजवान सिद्दीकीच्या मोबाईलमधून काही डिटेल्स मिळाले. त्यातून हे स्पष्ट होते की, आयशा श्रॉफ आणि अभिनेता साहिल खान यांच्यात वाद होते. या वादावरुनच सीसीआर शोधण्यात आले.
इतकंच नाही तर या प्रकरणी राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना रानौतचे नावही समोर आले आहे. डेप्युटी कमिश्नर पोलीस अभिषेक त्रिमुखने सांगितले की, कंगणाने देखील २०१६ मध्ये अशाच प्रकारे ऋतिक रोशनचा मोबाईल नंबर रिजवान सिद्दीकीसोबत शेअर केला होता, हे तपासानंतर समोर आले आहे. मात्र याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. त्याचा तपास सुरू आहे.
कॉल डिटेल्स रेकॉर्ड करणारी एक गॅंगचा शोध मुंबई पोलिसांना लागला होता. याप्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.