740 कोटींचे बजेट, 8726 कोटींची कमाई करणारा चित्रपट, 26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा तुम्ही ओळखला का?

या चित्रपटाला आतापर्यंत 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, जे ऐकल्यानंतर चाहत्यांना आता कळलंच असेल की आम्ही कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. 

Updated: Sep 24, 2023, 08:52 PM IST
740 कोटींचे बजेट, 8726 कोटींची कमाई करणारा चित्रपट, 26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा तुम्ही ओळखला का?  title=

मुंबई : चित्रपट प्रेमी जगात सर्वत्र आढळतात, ज्यांना प्रत्येक चित्रपटाबद्दल माहिती असते. पण 26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यात दाखवण्यात आलेल्या सीन्सने लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 8726 कोटींची कमाई केली आहे. तर त्याचं बजेट फक्त ७४० कोटी रुपये होतं, जे आजच्या काळात खूप जास्त असेल.

या चित्रपटाला आतापर्यंत 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, जे ऐकल्यानंतर चाहत्यांना आता कळलंच असेल की आम्ही कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा सिनेमा दुसरा तिसरा कोणता नसून सुंदर रोमान्स आणि ड्रामाने भरलेला टायटॅनिक चित्रपट आहे.

जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित "टायटॅनिक" एक महाकाव्य आहे, अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्सने परिपूर्ण आहे. या R.M.S. च्या दुर्दैवी पहिल्या प्रवासावर आधारित आहे. टायटॅनिक हे व्हाईट स्टार लाइनचा अभिमान आणि आनंद होता आणि "ड्रीम शिप" म्हणून ओळखली जाणारी त्याच्या काळातील सर्वात शानदार जहाज होती. पण हे जहाज शेवटी 15 एप्रिल 1912 च्या पहाटे उत्तर अटलांटिकच्या बर्फाळ पाण्यात बुडाली आणि 1,500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, शोकांतिका व्यतिरिक्त, यात एक सुंदर लव्हस्टोरी देखील दाखण्यात आली आहे, ती म्हणजे रोझ आणि जॅकची.

लिओनार्डो डी कॅप्रियो जॅकच्या भूमिकेत आणि केट विन्सलेट टायटॅनिकमध्ये रोजच्या भूमिकेत दिसला होता. तर बिली झेन, फ्रान्सिस फिशर, ग्लोरिया स्टुअर्ट, बिल पॅक्स्टन, सुझी अ‍ॅमिस आणि डॅनी नुकी हे महत्त्वाची पात्र होते. हा चित्रपट 19 डिसेंबर 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनासह 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले.