मुंबई : आंतरराष्ट्रीय पॉप स्टार Britney Spears ने बॉयफ्रेंड Sam asghari सोबत साखरपुडा केला आहे. तिने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांसोबत ही घोषणा केली आहे. तिने व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या बरोबरच ब्रिटनीच्या हातात हिऱ्याची अंगठीदेखील दिसत आहे. बॉयफ्रेंड सॅम देखील तिच्यासोबत दिसत आहे.
ब्रिटनीने फ्लॉन्ट केली रिंग
39 वर्षीय पॉप स्टार ब्रिटनी वेगवेगळ्या प्रकारे तिची अंगठी फ्लॉन्ट करत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिची अंगठी दाखवताना दिसतेय, ज्याला असगरी विचारतोय, तुला ते आवडले का? ' यावर ती "होय" असं उत्तर देतेय. आता ब्रिटनीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. यासोबत, चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
असगरी व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे.
27 वर्षीय असगरी व्यवसायाने पर्सनल फिटनेस ट्रेनर आणि अभिनेता आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एंगेजमेंटची माहितीही दिली. त्यांचे मॅनेजर बॅंडन कोहन यांनीही एका मॅगझिनशी बोलताना साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा स्पीयर्सचे वडील जेमी स्पीयर्स यांनी एका आठवड्यापूर्वी गायकाच्या 'संरक्षक' पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. तिचे वडील 2008 पासून गायकाचे आयुष्य आणि संपत्ती नियंत्रित करत आहेत.
ब्रिटनीचे यापूर्वी दोनदा लग्न झालं आहे
विशेष म्हणजे ब्रिटनीने यापूर्वी दोनदा लग्न केलं आहे. तिचे लहानपणीचा मित्र जेसन अलेक्झांडरशी लग्न झालं होतं, मात्र तिचं हे लग्न जेसनने फक्त 55 तासांत तोडलं. यानंतर ती रॅपर केविन फेडरलिनसोबत रिलेशनशिपमध्ये आली आणि दोघांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलंही आहेत. मात्र, हे नातंही फार काळ टिकलं नाही आणि या दोघांनी घटस्फोट घेतला.