Brahmastra OTT Release: पाहा कधी आणि कोणत्या ओटीटीवर होणार रिलीज

रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपट जाणून घ्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार?

Updated: Sep 11, 2022, 10:07 PM IST
Brahmastra OTT Release: पाहा कधी आणि कोणत्या ओटीटीवर होणार रिलीज title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्र (brahmastra movie) सध्य़ा चांगली कमाई करताना दिसत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbeer abd alia) यांच्या चित्रपटाला ग्रँड ओपनिंग मिळाली आहे. पहिल्या दोन दिवसांतच या चित्रपटाने 77 कोटींची कमाई (brahmastra collection) केली. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट चांगल्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे. चाहते हा सिनेमा आता OTT वर कधी बघायला मिळेल याची वाट पाहत आहेत.

ब्रह्मास्त्र कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

ब्रह्मास्त्राची क्रेझ चाहत्यांची उत्सूकता वाढवत आहे. ब्रह्मास्त्रला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी. असे असूनही, लोक वाट पाहत आहेत की त्यांना हा चित्रपट OTT वर कधी पाहायला मिळेल. जिथे ते घरी बसून आरामात चहा घेत हा सिनेमा बघू शकतील.

कोविड दरम्यान OTT वर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी हा एक आरामदायक अनुभव दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ब्रह्मास्त्र डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. असे मानले जाते की डिस्ने पहिल्या दिवसापासून ब्रह्मास्त्रचा मूव्ही कॅम्पेन पार्टनर असल्याने ओटीटीचे हक्कही त्याला विकले गेले आहेत.

अॅमेझॉनला देखील त्याचे हक्क मिळू शकतो. कारण धर्मा फिल्म्सचा अॅमेझॉनसोबत करार आहे, ज्याअंतर्गत त्यांचा प्रत्येक सिनेमा केवळ अॅमेझॉनवर रिलीज होतो. प्रत्यक्षात चित्रपटाचे हक्क कोणाला मिळणार हे सध्या तरी स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. या चित्रपटाचे हक्क मोठ्या रकमेत विकले गेल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट सुमारे 410 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

ऑक्टोबरमध्ये ओटीटीवर येणार

या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. चित्रपट निर्मात्यांना त्याचे थिएटर रिलीज यशस्वी करण्यासाठी पूर्ण लक्ष द्यायचे आहे. ट्रेड अॅनालिस्टवर विश्वास ठेवला तर चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव वेगळा असतो. स्मोकी अॅक्शन आणि जबरदस्त व्हीएफएक्सने भरलेल्या या चित्रपटाची मजा फक्त रुपेरी पडद्यावरच येऊ शकते. अशा परिस्थितीत, ओटीटीवर चित्रपट लवकर प्रदर्शित केल्यास नुकसान होऊ शकते, असे निर्मात्याचे मत आहे. 

अलीकडे असा ट्रेंड झाला आहे की निर्मात्यांना चित्रपटगृह आणि ओटीटी रिलीज दरम्यान 6 आठवड्यांचे अंतर ठेवायचे आहे.

या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगमधून निर्मात्यांनी 22 कोटी कमावले आहेत. अनेक दिवसांपासून अलौकिक विषयावरील चित्रपटाची चर्चा होती. या भरवशावर वीकेंड निघून गेला, पण पुढे काय? आगामी आठवडे ब्रह्मास्त्रच्या कमाईवर काय परिणाम करतात हे पाहणे मनोरंजक असेल.

Latest Marathi News, Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at 24taas.com